अभिनेत्रीची काढली छेड, जाब विचारताच रोमिओनं केली मारहाण, PHOTO VIRAL

अभिनेत्रीची काढली छेड, जाब विचारताच रोमिओनं केली मारहाण, PHOTO VIRAL

महिलांसोबत गैरवर्तन केल्याची वेगवेगळी प्रकरणं रोज समोर येत आहेत. असाच एक प्रकार मुंबईच्या रेल्वे स्थानकात घडला...

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर : महिलांसोबत गैरवर्तन केल्याची वेगवेगळी प्रकरणं रोज समोर येत आहेत. कधीही आणि कुठेही महिलांना अशी वागणूक मिळते. यात फक्त सामान्य महिलाच नाही तर स्टार कलाकारांचाही समावेश आहे. नुकतीच एका टीव्ही अभिनेत्रीसोबत काही व्यक्तींनी छेडछाड केल्य़ाची घटना घडली आहे. रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती या अभिनेत्रीला सर्वांसमोर एकटक पाहत होती. जेव्हा या अभिनेत्रीनं त्याला याचा जाब विचारला. त्यावर त्यानं तिला मारहाण सुद्धा केली.

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आणि स्प्लिटव्हिलाची एक्स कंटेस्टंट हर्षिता कश्यप हिच्यासोबत चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत या अभिनेत्रीनं सांगितलं, एक काम संपवून जेव्हा मी माझा एक एनआरआय मित्र पालासोबत तिकीट घेत होते. त्यावेळी एक व्यक्ती माझ्याकडे एकटक पाहत असल्याचं माझ्या लक्षात आलं. सुरुवातीला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर तो सतत असंच करत राहिला आणि त्यानंतर तो आमचा पाठलाग करू लागला. त्यामुळे मी त्याला याचा जाब विचारला.

घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय झालं होतं, मलायकानं केला खुलासा

 

View this post on Instagram

 

Freshhhhhhhh mood 💗#diwalieve #morningfresh #festiveglow#harshitakashyap #blessed🙏

A post shared by Harshita Kashyap (@harshitak911) on

या अभिनेत्रीनं पुढे सांगितलं, मी जेव्हा त्याला आमचा पाठलाग करण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याला राग आला आणि तो मला म्हणाला जर मी तुझ्याकडे बघतोय तर तुला काय समस्या आहे. त्यानंतर आमच्यात वाद झाला आणि त्यानं माझा मित्र पालाच्या कानाखाली मारलं. मग मी सुद्धा त्या व्यक्तीला मारलं तर त्यानं माझ्यावरही हात उचलला. नंतर रेल्वे पोलिसांनी मध्ये पडत आम्हाला वाचवलं आणि ते त्याला पकडून घेऊन गेले.

शाहरुख-सलमान-आमिरमुळे उद्ध्वस्त झालं या HOT अभिनेत्रीचं करिअर

चर्चगेट रेल्वे पोलिसांनी याबद्दल हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं, एका शाहरुख शेख नावाच्या 29 वर्षीय व्यक्तीला आम्ही अटक केलं आहे. तो वरळीच्या मरियप्पा नगरचा राहणारा आहे आणि तो एका प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये करतो. सध्या या शाहरुखची चौकशी केली जात आहे. तर या झटापटीत हर्षिताच्या हाताला दुखापत झाली होती ज्याचा हिंदुस्तान टाइम्सनं प्रसिद्ध केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फिटनेस जपताना 'हे' पदार्थ खाणं कटाक्षानं टाळतो शाहीद कपूर

Published by: Megha Jethe
First published: December 5, 2019, 12:19 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading