मुंबई, 12 फेब्रुवारी : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याची चर्चा बीटाऊनमध्ये जोरदार सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकानं तिच्या ड्रीम वेडिंगच्या आयडिया शेअर केल्यानंतर हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुननं मलायकाशी सध्या लग्न करु इच्छित नसल्याचं स्पष्ट केलं. यासोबतच त्यानं यामागचं कारणही सांगितलं आहे.
अर्जुन कपूरनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्याच्या लग्नाचा प्लान शेअर केला होता. यासोबतच त्याचं लग्न गुपचूप होणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं होतं. पण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुननं, सध्या तरी माझा लग्नाचा कोणताही विचार नाही असं स्पष्ट केलं. तसेच जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी लग्न करेन असंही त्यानं सांगितलं.
तेजश्री प्रधाननं पहिल्याच बॉलिवूड सिनेमात दिला LIP LOCK सीन, पाहा VIDEO
अर्जुन म्हणाला, मी माझ्या वयापेक्षा जास्त समजदार आहे त्यामुळे अनेकदा मला याचा परिणामही भोगावा लागला आहे. लग्न हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे त्यामुळे हा निर्णय मी घाईघाईत घेऊ शकत नाही. योग्य वेळ आल्यावर मी हा निर्णय घेईन आणि जेव्हा मी लग्न करेन तेव्हा सर्वांना बोलवेन. माझी पूर्ण फॅमिली बिग फॅट वेडिंगमध्ये विश्वास ठेवते. त्यामुळे माझं लग्न छोट्या स्वरुपात होणार नाही. त्यामुळे आता जेव्हा अर्जुनचं लग्न होईल तेव्हा त्याबद्दल सर्वांना समजेल हे नक्की.
सारा अली खानला लागलेत लग्नाचे वेध, अभिनेत्रीनं सांगितला सिक्रेट वेडिंग प्लान
या आधी मलायका अरोरानं नुकतीच नेहा धुपियाचा चॅट शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये हजेरी लावली. यावेळी तिनं अर्जुन आणि तिच्या नात्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार मलायका अर्जुन बद्दल म्हणाली, ‘अर्जुन प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे मात्र त्याला पैसे सांभाळता येत नाहीत.’ याशिवाय मलायकानं अर्जुन आणि तिच्या लग्नाविषयी सुद्धा यावेळी चर्चा केली. तिच्या बोलण्यावरुन तरी ती लग्नासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं दिसत आहे.
ड्रीम वेडिंग बद्दल बोलताना मलायका म्हणाली, ‘माझं ड्रीम वेडिंग बीचवर होईल आणि हे एक व्हाइट वेडिंग असेल. लग्नात मला Elie Saab gown घालायचा आहे आणि माझी गर्ल्स गँग माझ्या ब्राइडमेट्स असतील. मला ब्राइडमेट्स ही संकल्पना खूप आवडते त्यासाठी मला व्हाइट वेडिंग करायचं आहे.’ याआधीही मलायका आणि अर्जुनला त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं गेलं होतं. मात्र प्रत्येक वेळी हा विषय त्यांनी टाळला होता. सध्या तरी आम्ही एकमेकांना वेळ देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
दिल्ली निवडणुकांच्या निकालानंतर कतरिनाचा VIDEO VIRAL, वाचा काय आहे सत्य