मुंबई, 11 फेब्रुवारी : झी मराठीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान आता बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. छोटा पडदा आणि मराठी सिनेमांनंतर तेजश्रीनं आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. तिच्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून या सिनेमात तिनं दिलेल्या लिपलॉक सीनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘बबलू बॅचलर’ या सिनेमातू तेजश्री बॉलिवूड पदार्पण करत असून अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तेजश्रीने आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमात लिपलॉक सीन दिला आहे. आता तिचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना कितपत आवडतो हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच समजणार आहे. पण त्याआधी सोशल मीडियावर मात्र तेजश्रीच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्ली निवडणुकांच्या निकालानंतर कतरिनाचा VIDEO VIRAL, वाचा काय आहे सत्य
दरम्यान, स्वतः तेजश्रीने तिच्या सिनेमाचे पहिले पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले असून तेजश्रीच्या चाहत्यांनीही तिच्या नवीन प्रवासासाठी तिला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. तेजश्री आणि शर्मन यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात पूजा चोप्रा, राजेश शर्मा आणि मनोज जोशी यांच्यांही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अग्नीदेव चटर्जी यांनी केलं आहे. हा सिनेमा येत्या 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Oscar च्या रेड कार्पेटवर सॅन्डविच घेऊन पोहोचली अभिनेत्री, कारण वाचून व्हाल हैराण
होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेत तेजश्रीनं जान्हवी नावाच्या सोशिक आणि समंजस तरुणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तिनं मराठी अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेसाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. शाहरुखची लेक पुन्हा एकदा चर्चेत, सुहानाचा सेल्फी सोशल मीडियावर VIRAL