हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या आधीच मराठीतील अजून एका अशाच रील लाईफ जोडप्याने रियल आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.
छोट्या पडद्यावरील 'ती परत आलीये' या मालिकेतील रिल लाईफ जोडी नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांनी ख-या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.
नचिकेत आणि तन्वीचा याच वर्षी जून महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. हे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता.
'ती परत आलीये' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान नचिकेत आणि तन्वी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नचिकेतने या मालिकेत विक्रांतची भूमिका निभावली होती तर तन्वीने रोहिणीचे पात्र साकारले होते.