मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Vicky kaushal - katrina kaif च्या घरातील 'त्या' आवाजाला वैतागली शेजारीण Anushka sharma; नवजोडप्याला दिला एक खास मेसेज

Vicky kaushal - katrina kaif च्या घरातील 'त्या' आवाजाला वैतागली शेजारीण Anushka sharma; नवजोडप्याला दिला एक खास मेसेज

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या नवजोडप्यासाठी अनुष्का शर्माने (Anushka sharma) एक खास पोस्ट केली आहे.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या नवजोडप्यासाठी अनुष्का शर्माने (Anushka sharma) एक खास पोस्ट केली आहे.

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या नवजोडप्यासाठी अनुष्का शर्माने (Anushka sharma) एक खास पोस्ट केली आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 10 डिसेंबर : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नानंतर (Vicky Kaushal Katrina Kaif wedding) त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मानेसुद्धा (Anushka sharma) या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत (Anushka sharma wishes Vicky Kaushal Katrina Kaif. सोशल मीडियावर तिने या कपलसाठी खास पोस्ट केली आहे. पण या पोस्टमध्ये अनुष्काच्या एका खास संदेशने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विकी आणि कतरिना लग्नानंतर मुंबईच्या जुहूत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये ते राहणार आहेत. अनुष्का शर्माचे त्यांची शेजारीण आहे. विकी-कतरीनाच्या घरातून येणाऱ्या आवाजाला अनुष्का वैतागली आहे. तिने या दाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासह त्यांच्या घरातून येणाऱ्या त्या आवाजाचाही उल्लेख केला आहे. तिने सोशल मीडियावरच सर्वांसमोर त्यांच्यासाठी एक संदेशही दिला आहे.

अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विकी-कतरिना यांच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे आणि त्यावर लिहिलं आहे, "तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. तुम्ही आयुष्यभर सोबत राहा". अनुष्का पुढे म्हणाली, "अखेर तुम्ही लग्न केलं आहे आणि आता लवकरच आपल्या नव्या घरात जाल. आम्हाला कन्स्ट्रक्शनचा आवाज ऐकू येणार नाही". अनुष्काच्या या पोस्टवरूनच ती विकी-कतरिनाच्या घरातील कन्स्ट्रक्शनच्या त्या आवाजांना किती वैतागली आहे, हे स्पष्ट होतं आहे.

हे वाचा - विकी-कतरीनाच्या लग्नाच्या फोटोसोबत व्हायरल होतोय चहावाल्याचा फोटो; कारण आहे खास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला विकीनं अंधेरी येथील त्याच्या आई-वडिलांच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानं जुलै महिन्यात जुहूतील 'राजमहल' (Rajmahal) या अल्ट्रा लक्झुरियस (ultra-luxurious) आलिशान इमारतीचा आठवा मजला भाड्यानं घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही कलाकारांनी अनेकदा घराच्या सजावटीसाठी (home decor) आणि इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी याठिकाणाला भेटी दिल्या आहेत. याच ठिकाणी ते अनेकदा एकत्र दिसले. सुरुवातीला घर पाहण्यासाठी मात्र ते सोबत गेले नव्हते, असंही सूत्रांनी सांगितलं.अगोदर हाती आलेल्या माहितीनुसार, या अपार्टमेंटसाठी 1.75 कोटी रुपयांची रक्कम डिपॉझिट म्हणून भरली आहे. जुलै 2021 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी विकीनं हे अपार्टमेंट भाड्यानं घेतलं आहे. सुरुवातीच्या 36 महिन्यांचं भाडं 8 लाख रुपये प्रति महिना इतकं असेल. त्यानंतर एका वर्षासाठी दरमहा 8 लाख 40 हजार रुपये तर शेवटच्या वर्षासाठी दरमहा 8 लाख 82 हजार रुपये भाडं भरावं लागणार आहे.

हे वाचा - या PHOTOS मध्ये तुम्ही कतरिनाची एंगेजमेंट रिंग नोटीस केली का? इतकी आहे किंमत

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli Anushka Sharma) हे विकी आणि कतरिनाचे शेजारी आहेत. राजमहल इमारतीमध्ये विराट-अनुष्कानं दोन मजले खरेदी केलेले आहेत.

First published:

Tags: Anushka sharma, Bollywood, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal