मुंबई 4 जुलै**:** बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि गांधी-नेहरू कुटुंबीय यांचे घनिष्ठ संबंध होते. परंतु राहुल गांधींमुळे (Rahul Gandhi) या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला असा खळबळजनक दावा जेष्ठ पत्रकार संतोष भारतीय (Santosh Bhartiya Book) यांनी केला आहे. हा दावा त्यांनी आपल्या एका पुस्तकाद्वारे केला आहे. या पुस्तकात त्यांनी व्ही.पी. सिंग, सोनिया गांधी, चंद्रशेखर यांसारख्या अनेक राजकीय नेत्यांबाबत चकित करणारे दावे केले आहेत. राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी एकाला अटक, 5 जणांवर गुन्हा दाखल सोनिया गांधी यांनी राहुल गांधींच्या शिक्षणासाठी काही आर्थिक मदत करावी अशी विनंती बिग बींना केली होती. परंतु या विनंतीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल यांच्या शिक्षणाबाबत सोनिया गांधी फारच चिंतेत होत्या. अशा प्रतिकूल परिस्थितीत बिग बींकडे त्या मदतीची अपेक्षा करत होत्या. परंतु त्यांनी त्यांचा अपेक्षाभंग केला. त्यामुळं पुढच्या काळात बच्चन आणि गांधी कुटुंबीय यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाला असा दावा संतोष भारतीय यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने घडवली अद्दल, आता पोलीस… या घटनेमुळे पडली पहिली ठिणगी अमिताभ बच्चन यांनी राजीव गांधींकडे त्यावेळी 20 लाख रुपयांची मदत मागितली होती. परंतु राजीव गांधींकडे त्यावेळी इतके पैसे नव्हते त्यामुळे ते मदत करु शकले नाही. मात्र त्यानंतर 75 हजार रुपयांची मदत सोनिया गांधी यांनी केली. परंतु या प्रकरणामुळे दोन्ही कुटुंबीयांच्या संबंधात पहिली ठिणगी पडली. त्यानंतर वेळोवेळी अप्रत्यक्षरित्या राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन एकमेकांवर टीका करत होते. अन् संबंध राहुल गांधींच्या शिक्षणामुळे अधिक ताणले गेले. असे अनेक दावे संतोष यांनी आपल्य या पुस्तकात केले आहेत. दरम्यान त्यांच्या या दाव्यांवर गांधी कुटुंबीय किंवा बच्चन कुटुंबीय यांपैकी कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







