मुंबई 4 जुलै**:** प्रसिद्ध कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या आत्महत्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळींवर राजेश साप्ते यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापैकी एका व्यक्तीस पोलिसांनी अटकही केली आहे. रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने घडवली अद्दल, आता पोलीस… राजेश साप्ते यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. लक्षवेधी बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट आणि एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यातूनच काही व्यक्ती त्यांना त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच आरोपींनी कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, लेबरला कामावर येऊ देणार नाही. शिवाय व्यवसायिक नुकसान करण्याची ही धमकी देखील देण्यात आली होती. राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडलं होतं, असं मयत राजेश यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे. बिग बींच्या बंगल्यात अनाधिकृत बांधकाम; पडणार BMC चा हातोडा पाच आरोपींपैकी चंदन रामकृष्ण ठाकरे याने विश्वासघात करून वेळोवेळी फसवणूक केली असल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलं आहे. पाचही आरोपींच्या जाचाला कंटाळून राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आल्याचं सोनाली यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) , गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून, चंदन रामकृष्ण ठाकरे याला अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.