मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने घडवली अद्दल, आता पोलीस...

रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने घडवली अद्दल, आता पोलीस...

 सातत्यानं होणाऱ्या प्रकारामुळं आता ती संतापली आहे. अन् तिने थेट या ट्रोलर्सविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

सातत्यानं होणाऱ्या प्रकारामुळं आता ती संतापली आहे. अन् तिने थेट या ट्रोलर्सविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

सातत्यानं होणाऱ्या प्रकारामुळं आता ती संतापली आहे. अन् तिने थेट या ट्रोलर्सविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

मुंबई 4 जुलै: श्रुती दास (Shruti Das) ही बंगाली मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या माध्यमातून गेलं एक दशक ती सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या दरम्यान तिच्या त्वचेच्या रंगावरून अनेकांनी तिची खिल्ली उडवली. (Shruti Das abused online for dusky complexion) जेव्हा कधी ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करते त्यावेळी देखील काही नेटकरी कृष्णवर्णामुळं तिला ट्रोल करतात. मात्र या सातत्यानं होणाऱ्या प्रकारामुळं आता ती संतापली आहे. अन् तिने थेट या ट्रोलर्सविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

काँग्रेस नेत्याला नकार देणारी मेहरीन पीरजादा आहे तरी कोण?

कोलकाता पोलिसांनी श्रुतीच्या तक्रारीची गांभीर्याने नोंद घेतली आहे. तिने तक्रारीसोबतच काही स्क्रीनशॉट देखील पोलिसांना दिले. या स्क्रीनशॉटमध्ये दिसणाऱ्या युझर्सची धरपकड करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल असं आश्वासन पोलिसांनी श्रुतीला दिलं आहे.

बिग बींच्या बंगल्यात अनाधिकृत बांधकाम; पडणार BMC चा हातोडा

वृत्तमाध्यमांशी संवाद साधताना पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले, “आपला देश प्रगतीपथावर आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आपण वापरतोय. दररोज नवनवे शोध लावतोय. परंतु तरी देखील आपण खरंच प्रगती करतोय का? असा प्रश्न अशी प्रकरणं पाहिली की पडतो. एखाद्याच्या त्वचेच्या रंगावरुन त्याला चिडवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. कारण त्वचेचा रंग कृष्णवर्णीय असेल की गौरवर्णीय हे माणसाच्या हातात नाही. त्यामुळं वर्णद्वेश हा कायद्यानं गुन्हा आहे. अन् या गुन्हेगारांना आम्ही अद्दल घटवणार आहोत. या प्रकरणाद्वारे समाजासमोर एक उदाहरण उपल्ब्ध होईल असा विश्वास आम्हाला आहे.”

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Crime, Entertainment, Social media troll, Tollywood, Trollers