'त्या' रात्री असं काय झालं ज्यामुळे अमिताभ-जया यांच्या जीवनातून रेखा झाल्या दूर

'त्या' रात्री असं काय झालं ज्यामुळे अमिताभ-जया यांच्या जीवनातून रेखा झाल्या दूर

70 च्या दशकात अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची लव्ह स्टोरी प्रचंड गाजली. मात्र एका रात्रीनंतर रेखा अचानक अमिताभ यांच्या जीवनातून गायब झाल्या.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस. आपल्या अभिनयानं संपूर्ण बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अमिताभ यांचा उत्साह आजही तरुण अभिनेत्यांना लाजवेल असाच आहे. अभिनयसोबत अमिताभ यांचं खासगी जीवन सुद्धा खूप चर्चेत राहिलं. 70 च्या दशकात अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची लव्ह स्टोरी प्रचंड गाजली. मात्र एका रात्रीनंतर रेखा अचानक अमिताभ यांच्या जीवनातून गायब झाल्या. पण त्या रात्री नेमकं काय झालं ज्यामुळे रेखांनी हा निर्णय घेतला. जाणून घेऊयात अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं...

तो काळ होता 1977चा जेव्हा रेखा भांगात सिंदूर भरून गर्भवती असल्याच्या चर्चा मीडियामध्ये पसरवून अमिताभ यांच्यसोबतच नातं जगजाहिर करण्याच्या तयारीत होत्या. तर दुसरीकडे जया बच्चन मात्र शांतपणे तुटत चाललेला आपला संसार सावरायचा प्रयत्न करण्यात गुंतल्या होत्या. अमिताभ आणि रेखा यांचं नात्याची चर्चा त्यावेळी जोरदार सुरू होती. मात्र जयांनी यावर कधीच कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्या शांतपणे आपलं काम करत राहिल्या.

Rangeela च्या नव्या व्हर्जनच्या Trailer मध्ये दिसल्या नैना गांगुलीचा Hot अदा

एक दिवस जेव्हा अमिताभ कोणत्यातरी सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्तानं मुंबईच्या बाहेर गेले होते. त्यादिवशी जया यांनी रेखांना फोन केला. रेखा यांना वाटलं की आता जया त्यांच्याशी भांडतील. त्यांना अनेक गोष्टी ऐकवतील. पण जया यांनी असं काहीही केलं नाही. जया यांनी रेखा यांना रात्री घरी जेवायला येण्याचं निमंत्रण दिलं. रेखांना वाटलं घरी गेल्यावर जया त्यांचा अपमान करतील किंवा मारामारी होईल.

शूटिंग दरम्यान रेखा यांना 5 मिनिटं KISS करत होता अभिनेता, झाली अशी अवस्था

रात्री जेव्हा रेखा नटून थटून जया यांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी जया अत्यंत साध्या कपड्यांमध्ये होत्या. त्यांनी रेखा यांचं स्वागत केलं. गप्पा मारल्या. दोघींनी एकत्र जेवण केलं. जयांनी रेखा यांना संपूर्ण घर, गार्डन दाखवलं त्यांना आदर सत्कार केला.  डिनर नंतर जेव्हा रेखा परत निघाल्या त्यावेळी त्यांना निरोप देताना जया यांनी त्याना एक गोष्ट सांगितली ज्यामुळे रेखा यांच्या पायाखालची जमिन सरकली. जया म्हणाल्या, 'काहीही झालं तरी मी अमितला सोडणार नाही.'

दुसऱ्या दिवशी या डिनरच्या प्रचंड चर्चा झाल्या उलट सुलट बातम्या छापल्या गेल्या. मात्र याविषयी ना जया कधी काही बोलल्या ना रेखा यांनी कधी तोंड उघडलं. पण त्या एका रात्रीनंतर अमिताभ यांच आयुष्य मात्र पूर्णपणे बदललं. रेखा यांनी अमिताभ यांच्या जीवनातून दूर जाण्याचा निर्णय घेतला. कारण रेखा यांना समजल होतं की जयांना या अफेअर बद्दल माहित असलं तरीही त्या कुटुंब वाचवण्यासाठी आपलं तोंड कधीच उघडणार नाहीत.

'छपाक'च्या शूटिंगनंतर दीपिकानं जाळला प्रोस्थेटिक्स लुक, कारण वाचून व्हाल हैराण

=========================================================

VIDEO: ड्रग्ज माफियांचा पोलिसांवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

Published by: Megha Jethe
First published: October 11, 2019, 9:00 AM IST

ताज्या बातम्या