प्रेग्नन्सीविषयी दीपिका पदुकोण म्हणते, आम्हाला मुलं आवडतात आणि...

प्रेग्नन्सीविषयी दीपिका पदुकोण म्हणते, आम्हाला मुलं आवडतात आणि...

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपिकानं प्रेग्नन्सीच्या चर्चांवर मौन सोडलं.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मागच्या वर्षी  नोव्हेंबरमध्ये या दोघांनीही लगीनगाठ बांधली. त्यांच्या या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपिकानं प्रेग्नन्सीच्या चर्चांवर मौन सोडलं.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रेग्नन्सीच्या चर्चा फक्त अफवा असल्याचं म्हणत दीपिकानं यावर तिचं मत दिलं आहे. दीपिका म्हणाली, 'हे खरंच निराशजनक आहे. जर आम्ही बराच काळ एकमेकांना डेट करत होतो त्यामुळे आमचं लग्न कधी होणार आणि आम्हाला मुलं कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आम्ही अशा अफवा ऐकून अजिबात हैराण झालेलो नाही. आम्हालाही मुलं हवी आहेत आणि आम्ही मुलांवर खूप प्रेमही करतो. पण सध्या आम्ही दोघंही पालक होण्यासाठी तयार नाही आहोत. सध्या तरी आम्ही आमच्या करिअरकडे लक्ष देत आहोत. त्यामुळे आमच्यासाठी आता पालकत्व स्वीकारणं योग्य ठरणार नाही आणि आम्ही अद्याप याबद्दल विटारही केलेला नाही.'

'त्या' रात्री असं काय झालं ज्यामुळे अमिताभ-जया यांच्या जीवनातून रेखा झाल्या दूर

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच '83'मध्ये एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा 1983मध्ये भारतान साकारलेल्या वर्ल्डकप विजयावर आधारित आहे. या सिनेमात रणवीर क्रिकेटर आणि भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर दीपिका त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हजेच कपिल यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकरणार आहे.

Rangeela च्या नव्या व्हर्जनच्या Trailer मध्ये दिसल्या नैना गांगुलीचा Hot अदा

लग्नानंतर दीपिका आणि रणवीरचा एकत्र असा हा पहिलाच सिनेमा आहे.  रणवीर आणि दीपिका व्यतिरिक्त या सिनेमात हार्डी संधू, एमी विर्क, साकिब सलीम, आदिनाथ कोठारी, साहिल खट्टर यासारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर 83 शिवाय दीपिका मेघना गुलजारच्या छपाकमध्येही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

VIDEO : TikTok वर अवतरली 'मधुबाला'; सोशल मीडियावर चाहते घायाळ

=============================================================

VIDEO: ड्रग्ज माफियांचा पोलिसांवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 12:14 PM IST

ताज्या बातम्या