जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : TikTok वर अवतरली 'मधुबाला'; सोशल मीडियावर चाहते घायाळ

VIDEO : TikTok वर अवतरली 'मधुबाला'; सोशल मीडियावर चाहते घायाळ

VIDEO : TikTok वर अवतरली 'मधुबाला'; सोशल मीडियावर चाहते घायाळ

एक सामान्य तरुणी थेट मधुबालाचा अवतार घेऊन सध्या TikTok वर धमाल करत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ आणि मधुबालाचा भास होतो की नाही सांगा..

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई : व्हिडीओ शेअरिंग अॅप TikTok सध्या सोशल मीडियावर हिट आहे. लोकप्रिय गाणी, डायलॉग इथे शेअर होत असतात पण सेलेब्रिटींच्या जागी दिसतात सामान्य माणसं. अशीच एक सामान्य तरुणी थेट मधुबालाचा अवतार घेऊन सध्या TikTok वर धमाल करत आहे. हुबेहुब मधुबालासारखी दिसणारी ही TikTok स्टार कधी मधुबालाच्या गाण्यावर ओठ हलवताना दिसते तर कधी मी खरंच इतकी सुंदर दिसते का… म्हणून लाडिकपणे मधुबालाच्या स्टाइलने लाजतच विचारते. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ आणि मधुबालाचा भास होतो की नाही सांगा..

जाहिरात

मधुबालाच्या जवळ जाणारे तिचे लुक्स आहेत नक्की. मध्यंतरी सलमान खानच्या डुप्लिकेटनं टिकटॉकवर असाच धुमाकूळ घातला होता. हेही वाचा - शूटिंग दरम्यान रेखा यांना 5 मिनिटं KISS करत होता अभिनेता, झाली अशी अवस्था आता मधुबालाच्या लुकमधली ही तरुण कलाकार अशीच जबरदस्त हिट होत आहे. वाचा - ‘छपाक’च्या शूटिंगनंतर दीपिकानं जाळला प्रोस्थेटिक्स लुक, कारण वाचून व्हाल हैराण प्रियांका कांडवाल असं या तरुणीचं नाव आहे. टिकटॉकची मधुबाला म्हणून ती लोकप्रिय होत आहे. पाहा तिचे आणखी काही व्हिडिओ.

प्रियांका कडवाल या तरुण कलाकारावर अनेकांनी व्हिडिओसुद्धा तयार केले आहेत. ते YouTube वरदेखील हिट आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात