मुंबई, 11 ऑक्टोबर : अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ याचा 'वॉर' (WAR) सिनेमा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात टायगर आणि हृतिक यांच्यात तगडी फाइट पाहायला मिळात आहे. अॅक्शनच्या बाबतीत या दोन्ही अभिनेत्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा होत्या. या अपेक्षांमध्ये हा सिनेमा उतरलाही पण टायगरच्या फिटनेसला मॅच करणं हृतिकसाठी सोप्पं नव्हतं.
हृतिकसाठी फिटनेसची समस्या आणखी वाढली ती 'सुपर 30' सिनेमामुळे. कारण या सिनेमाच्या दरम्यान हृतिकचं वजन बरंच वाढलं होतं. त्यामुळे वॉरसाठी त्याला पुन्हा फिट होणं गरजेच होतं. हृतिकनं नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यानं वॉरसाठी बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी किती मेहनत घेतली याचा अनुभव शेअर केला आहे. हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
'त्या' रात्री असं काय झालं ज्यामुळे अमिताभ-जया यांच्या जीवनातून रेखा झाल्या दूर
हृतिकला सर्वांनीच 'धूम 2' आणि 'बँग बँग' सारख्या सिनेमात सुपरफिट बॉडीमध्ये पाहिलं आहे. मात्र 'सुपर 30'साठी त्याला त्याच्या शरीरात अनेक बदल करावे लागले होते. त्यामुळे 'सुपर 30'चा आनंद नंतर 'वॉर'चा कबीर साकारणं हृतिकसाठी खूपच आव्हानात्मक होतं. त्याला यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. हृतिकनं त्याचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात त्याचं बेढब शरीर ते फिट शेप बॉडी पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
Rangeela च्या नव्या व्हर्जनच्या Trailer मध्ये दिसल्या नैना गांगुलीचा Hot अदा
या व्हिडीओमध्ये हृतिक सांगतो, माझा एक पाय जन्मापासूनच लहान आहे आणि त्यामुळे मला स्लिप डिस्क सारखी समस्या होते. पण एवढ्या सर्व समस्यांवर मात करत हृतिकनं कबीरच्या भूमिकेसाठी स्वतःला तयार केलं. हृतिकच्या व्हिडीओला चाहत्यांची वाहवा मिळत आहे. पण यासोबतच बॉलिवूड कलाकारही या व्हिडीओवर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही. वरुण धवन, टाइगर श्रॉफ, कतरिना कैफ या कलाकरांनी हृतिकचं कौतुक केलं आहे.
VIDEO : TikTok वर अवतरली 'मधुबाला'; सोशल मीडियावर चाहते घायाळ
हृतिकचा वॉर हा सिनेमा सध्या 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पहिल्याच दिवशी 53 कोटींची बंपर ओपनिंग करणारा हा या वर्षांतील पहिलाच सिनेमा ठरला. त्यामुळे आता हा सिनेमा 300 कोटीच्या कमाईचा आकडा पार करेल असा विश्वास मेकर्सना वाटत आहे. असं झाल्यास 300 कोटींचा आकडा पार करणारा या वर्षातील हा पहिलाच सिनेमा बनेल. प्रेक्षकांमध्येही या सिनेमाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.
===============================================================
VIDEO: ड्रग्ज माफियांचा पोलिसांवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी केली मारहाण
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा