Home /News /entertainment /

लॉकडाऊमध्ये काम ठप्प असल्यामुळे 1 लाख मजुरांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन

लॉकडाऊमध्ये काम ठप्प असल्यामुळे 1 लाख मजुरांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन

कोरोनामुळे (Coronavirus) मजुरी करून पोट भरणारा वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा दैनंदिन मजुरीवर काम करणाऱ्या (Daily Wage Workers) 1 लाख मजुरांना अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात दिला आहे.

    मुंबई, 06 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या  संकटामुळे देशातील प्रत्येक नागरिकाचं जगणं कठीण झालं आहे. हातावरचं पोट असणाऱ्यांना तर उपाशीच राहुन दिवस घालवावे लागत आहे. सरकार गरीबांसाठी विविध योजना राबवत असलं तरीही सरकारी तिजोरीचा वापर जपून करणं भाग आहे. अशा परिस्थितीत देशातील उद्योगपती मदतीचा हात पुढे करत आहेत. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील कलाकारही शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत हातावर पोट असणाऱ्या मजुरांना घरी बसावं लागलं आहे. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात घरी चुल तरी कशी पेटवायची या विवंचनेत मजुरांना दिवस काढावे लागत आहेत.  त्यामुळे दैनंदिन मजुरीवर काम करणाऱ्या (Daily Wage Workers) 1 लाख मजुरांना महानायक अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात दिला आहे. (हे वाचा-शाहरुख खानच्या जवळच्या व्यक्तीची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, मेसेज करून मागितली माफी) अमिताभ बच्चन यांनी कोरोना व्हायरस संकटकाळात ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉइज कन्फेडरेशनशी जोडल्या गेलेल्या 1 लाख दैंनदिन वेतनावर काम करणाऱ्या मजुरांना मदत करण्याची घोषणा केली आहे. आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या या वर्गाला महिन्याभरासाठी लागणारं रेशन देणार असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. (हे वाचा-कोरोनाच्या लढ्यात फिल्म इंडस्ट्रीचा सहभाग, तुमच्या आवडत्या कलाकारांचे PHOTOS) सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएन) आणि कल्याण ज्वेलर्स यांनी अमिताभ यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. सोनी पिक्चर्सने रविवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, 'सध्या ज्या परिस्थितीत आहोत, यावेळी बच्चनजींनी सुरू केलेल्या 'We Are One' या उपक्रमाचं आम्ही सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आणि कल्याण ज्वेलर्स समर्थन करतो. या अंतर्गत 1 लाख परिवारांना महिन्याभराच्या अन्नधान्यासाठी आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे.' (हे वाचा-कोरोना रुग्ण आढळल्यामुळे अभिनेत्री अंकिता लोखंडेचं अपार्टमेंट सील) दरम्यान ही मदत कधीपासून देण्यात येणार आहे याबाबत स्पष्टता नाही आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे संचालक आणि सीईओ एन पी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या सीएसआर योजनेअंतर्गत एसपीएनने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर मिळून ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉइज कन्फेडरेशनमधील मजुरांच्या परिवारांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या