अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये आढळला कोरोना रुग्ण, संपूर्ण परिसर सील

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये आढळला कोरोना रुग्ण, संपूर्ण परिसर सील

मुंबईतील काही भाग कोरोना रुग्ण सापडल्याने सील करण्यात आले आहेत. टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री अंकिता लोखंडे ज्याठिकाणी मुंबईत राहते, ते अपार्टमेंट देखील सील करण्यात आले आहे.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : महाराष्ट्रामध्ये कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 490 आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धोका मुंबई आणि उपनगरांमध्ये आहे. मुंबईकरांनी खबरदारी न घेतल्यास  कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ शकते. दरम्यान मुंबईतील काही भाग कोरोना रुग्ण सापडल्याने सील करण्यात आले आहेत. टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री अंकिता लोखंडे ज्याठिकाणी मुंबईत राहते, ते अपार्टमेंट देखील सील करण्यात आले आहे. तीच्या कॉम्प्लेक्समधील एक रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार हो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण स्पेनवरून परतला होता.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये मित्राबरोबर जॉयराइड या अभिनेत्रीला पडली महागात, कारचा भीषण अपघात)

मालाडमधील या अपार्टमेंटमध्ये अनेक कलाकार वास्तव्यास आहेत. अशिता धवन, शैलेश गुलबनी, नताशा शर्मा, आदित्य रेडिज, मिशकत वर्मा हे कलाकार देखील अंकिताच्याच अपार्टमेंटमध्ये राहतात. TOI ला मिळालेल्या माहितीनुसार, 'D विंगमध्ये राहणारा हा रहिवाशी स्पेनमधून परतला होता. एअरपोर्टवर स्क्रीनिंगवेळी तो नेगिटिव्ह दाखवण्यात आला. त्यामुळे तो 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन होता. मात्र बाराव्या दिवशी त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसू लागली. त्यावेळी तो आणि त्याची पत्नी रुग्णालयात चाचणीसाठी पोहोचले. यामध्ये त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून पत्नीची चाचणी निगेटिव्ह आली आहे.' 26 मार्च रोजी  या व्यक्तीचंं निदान करण्यात आले होते.

(हे वाचा-कनिकाच्या 5 व्या कोरोना व्हायरस टेस्टचा रिपोर्ट समोर, रुग्णालयाने दिले नवे अपडेट)

दरम्यान या दाम्पत्याची भेट घेतलेल्या कोणामध्येही अद्याप कोरोनाची लक्षण दिसून आलेली नाही आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार याठिकाणी पोलीस तैनात आहेत, जेणेकरून कुणी बाहेर जाणार नाही किंवा कुणी आतमध्ये येणार नाही. अभिनेत्री अशिता धवनने देखील या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्याचप्रमाणे तिने मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि मुंबई पोलीस या दोघांचे आभार मानले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना लागणाऱ्या औषधांंची यादी गोळा करून, त्यांचा पुरवठा केल्याची माहिती तिने दिली. यामध्ये तिच्या सासुच्या औषधांचाही समावेश होता. आम्ही WHO च्या गाइडलाइनचे पालन करत असल्याची हमी देखील अशिता धवन हिने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2020 02:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading