शाहरुख खानच्या जवळच्या व्यक्तीची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, मेसेज करून मागितली माफी

शाहरुख खानच्या जवळच्या व्यक्तीची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, मेसेज करून मागितली माफी

शाहरुख खानचा प्रसिद्ध चित्रपट 'चेन्नई एक्स्प्रेस' (Chennai Express)च्या निर्मात्याच्या मुलीला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण जग दुष्परिणाम भोगत आहे.  तसच आता भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  जगभरातील अनेक सेलिब्रिटींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. भारतामध्ये गायिका कनिका कपूर ही सेलिब्रिटी कोरोनाशी झुंज देत आहे. दरम्यान आता शाहरुख खानचा प्रसिद्ध चित्रपट 'चेन्नई एक्स्प्रेस' (Chennai Express)च्या निर्मात्याच्या मुलीला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

(हे वाचा-कोरोना रुग्ण आढळल्यामुळे अभिनेत्री अंकिता लोखंडेचं अपार्टमेंट सील)

चेन्नई  एक्स्प्रेसचे निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शझा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. रविवारी याबाबत समजल्यानंतर तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. करीम त्यांंच्या कुटुंबीयांबरोबर मुंबईतील जुहू परिसरात राहतात, ज्याठिकाणी अनेक कलाकारांचं वास्तव्य आहे. निर्माता करीम मोरानी यांनी 'स्पॉटबॉय'ला दिलेल्या माहितीनुसार त्यांची मुलगी शझा नानावटी रुग्णालयात आयसोलेशन विभागात आहे. त्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे की, करीम यांची मुलगी ना परदेश दौऱ्यावर गेली होती ना ती परदेशातून परतलेल्या कुणाच्या संपर्कात होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्याचप्रमाणे करीम यांनी सोसायटीतील सदस्याना मेसेज पाठवून याबाबत माहिती दिली आहे तसंच माफी देखील मागितली आहे. त्यांनी लिहिलेल्या मेसेजनुसार सोसायटीमधील इतर लोकांची सुद्धा चाचणी होण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये मित्राबरोबर जॉयराइड या अभिनेत्रीला पडली महागात, कारचा भीषण अपघात)

करीम यांच्या इतर कुटुंबीयांची सुद्धा कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. करीम मोरानी बॉलिवूडमधील अनेक महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध चित्रपटांशी जोडले गेले आहेत. चेन्नई एक्स्प्रेस बरोबरच त्यांनी 'दिलवाले', 'हॅप्पी न्यू इयर', 'दम' या चित्रपटांची सुद्धा निर्मिती केली आहे. बोललं जातं की करीम शाहरुख खानच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत.

First published: April 6, 2020, 12:16 PM IST

ताज्या बातम्या