Home /News /entertainment /

'माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम' लग्नाच्या 8 वर्षानंतर रितेशची जेनेलियाकडे कबुली

'माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम' लग्नाच्या 8 वर्षानंतर रितेशची जेनेलियाकडे कबुली

बॉलीवुड स्टार रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांची जोडी फिल्म इंडस्ट्रीमधील एक हिट जोडी आहे. लग्नाच्या आठ वर्षानंतर रितेशने जेनेलियाला असं सांगितलं की त्याच दुसऱ्याच कुणावर प्रेम आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी रितेशने जेनेलियाला ही बाब सांगितली.

पुढे वाचा ...
  मुंबई, 4 फेब्रुवारी : बॉलीवुड स्टार रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांची जोडी फिल्म इंडस्ट्रीमधील एक हिट जोडी आहे. 2012 मध्ये 3 फेब्रुवारीला त्यांचं लग्न झालं. त्याआधीपासूनच म्हणजेच 'तुझे मेरी कसम' या चित्रपटापासूनच ही जोडी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र लग्नाच्या आठ वर्षानंतर रितेशने जेनेलियाला असं सांगितलं की त्याचं दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी रितेशने जेनेलियाला ही बाब सांगितली. रितेशने हा फनी व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यावर या बी-टाउन कपलच्या फॅन्सनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. लग्नाच्या 8 वर्षानंतर रितेश देशमुख आणि जेनेलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेनेलिया रितेशला सांगते की तिचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. मात्र रितेश असं उत्तर देतो की ‘माझं आणखी कुणावर तरी प्रेम आहे.’ यावर पुन्हा चिडून जेनेलिया कुणावर असं विचारते. तेव्हा रितेश खूप हुशारीने उत्तर देतो की ‘बेबी तुझ्या स्माईलवर.’ जेनेलिया त्याच्या या उत्तरावर खूश होते खरी पण त्यावर रितेशची कमेंट खूप भन्नाट आहे. त्यानंतर त्याने 'मौत को छुके वापस आ सकता हुँ' हा नवाझुद्दीन सिद्दीकाचा डायलॉग बोलल्याने हा व्हिडीओ आणखी फनी बनतोय. (हेही वाचा : नक्कीच रितेशची खैर नाही, लग्नाच्या वाढदिवशी VIDEO शेअर करून बायकोशी घेतला पंगा ) सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होणारा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
  View this post on Instagram

  WARNING ⚠️ ‘DO NOT’ try this stunt at home ......@geneliad

  A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

  इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करताना रितेशने सूचना देखील दिली आहे. ‘हा स्टंट घरी ट्राय करू नका’ अशी कॅप्शन देत रितेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रितेश-जेनेलियाच्या लग्नाच्या वाढदिवशी देखील रितेशने असाच एक फनी व्हिडीओ शेअर केला होता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  पुढील बातम्या