Tanhaji कडून बॉक्स ऑफिसचा गड सर, 25 व्या दिवशी केली इतकी कमाई

Tanhaji कडून बॉक्स ऑफिसचा गड सर, 25 व्या दिवशी केली इतकी कमाई

अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खानचा तान्हाजी सिनेमानं 25 दिवशीही बॉक्स ऑफिसवरचा आपला कब्जा सोडलेला नाही. चित्रपटाच्या कमाईचा आकडा बघून डोळे विस्फारतील.

  • Share this:

नवी दिल्‍ली, 04 फेब्रुवारी :  अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खानचा तान्हाजी सिनेमानं 25  दिवशीही बॉक्स ऑफिसवरचा आपला कब्जा सोडलेला नाही. 24 व्या दिवशीच कमाईचा 250 कोटींचा गड सर करणाऱ्या तान्हाजी आठवड्याच्या पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली होती.

तान्हाजी रिलिज होवून 25 दिवस उलटलेत तरीही तान्हाजी अजून हाऊसफुल गर्दी खेचतो आहे. नव्या सिनेमांनाही बॉक्स ऑफिसवर टक्कर देतो आहे. तान्हाजी सिनेमाला मिळणारा हा तुफान प्रतिसाद पाहता तान्हाजी 300 कोटींचाही पल्ला पार करू शकतो. चौथ्या आठवड्यातील सिनेमाच्या धमाकेदार कामगिरीनं 2019 मध्ये रिलिज झालेल्या कबीर सिंग या सर्वाधिक लोकप्रिय  सिनेमालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलंय. देशभरात CAA आणि NRC विरोधात आंदोलनं सुरु असतानाही त्याचा सिनेमाच्या कमाईवर फारसा परिणाम झालेला नाही. तान्हाजी सिनेमानं केवळ महाराष्ट्रातच नाही तर गुजरातमध्येही कमाईचे नवे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

तान्हाजी सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा समिक्षकांनी त्याला फारशी पसंती दिली नव्हती. पण तरीही सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जोरदार परफॉर्मन्स दिलाय. या ऐतिहासिकपटात अजय देवगण छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या मावळा तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे तर काजोल तान्हाजीची पत्नी सावित्रीच्या भूमिकेत आहे. सिनेमात सैफ अली खान हा उदयभान राठोडच्या भूमिकेत दिसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2020 07:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading