मुंबई, 4 फेब्रुवारी : सलमानच्या अमेरिकेतील फॅन्सना नाराज करणारी एक बातमी आहे. सलमान खानचा अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये एक शो होणार होता. येत्या एप्रिलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र हा कार्यक्रम आता एका महत्त्वाच्या कारणासाठी रद्द करण्यात आला आहे. सलमान खानचा हा शो रद्द होण्यामागचं कारण तुम्ही ऐकलं तर थक्क व्हाल. या शोचा आयोजक पाकिस्तानी आहे आणि त्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप करण्यात आला आहे. याआधी रेहानने अमेरिकेमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या शोचं आयोजन केलं होतं. यामध्ये मिका सिंग, बादशाह, पंकज उधास, सैफ अली खान या महत्त्वाच्या कलाकारांचा समावेश आहे. या इव्हेंट्सच्या माध्यमातून मिळणारा पैसा दहशतवादी संघटनांना पुरवत असल्याचा आरोप रेहानवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेहान भारत सरकारच्या रडारवर आहे. मात्र सलमानने रेहानने आयोजित केलेला शो रद्द केला आहे. असं बोललं जातंय की सलमान एखाद्या भारतीय आयोजकासोबत पुन्हा एकदा शोचं आयोजन करू शकतो. अनेक भारतीयांनी ट्विट करून सलमानने हा शो रद्द करावा अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे अनेकांनी रेहान सिद्दीकीवर जोरदार टीका देखील केली आहे.
First of all, @BeingSalmanKhan must boycott the event organised by ISI agent Rehan Siddiqi.
— Suresh Nakhua (सुरेश नाखुआ) 🇮🇳 (@SureshNakhua) February 4, 2020
Secondly, if @KFC and @pizzahut dont withdraw sponsorship for anti-India elements / events, they might have to face boycott in India.
गेल्या वर्षी #isiagentrehansiddiqi असा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड झाला होता. पाकिस्तानी आयोजक रेहान सिद्दीकीवर होणाऱ्या आरोपांमुळे सलमानने देखील त्याच्यासोबतचा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी ट्विटरवर जोर धरत होती.
अन्य बातम्या पाकला मौका नाहीच, 10 विकेटनी धूळ चारत टीम इंडियाची फायनलमध्ये धडक सहकाऱ्याला बाद करण्यासाठी धावणारे वर्ल्ड कप जिंकायला निघालेत, पाकचे खेळाडू ट्रोल सेमीफायनलमध्ये यशस्वीचे शतक, मुंबईत वडिलांना दिलेलं वचन आफ्रिकेत केलं पूर्ण

)







