मुंबई, 22 जून : शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असेला सिनेमा कबीर सिंह नुकताच रिलीज झाला. प्रेक्षकांकडून या सिनेमाचं सध्या खूप कौतुकही होत आहे. शाहिदच्या अभिनयाचीही खूप प्रशंसा केली जात आहे. ओपनिंगच्या दिवशीच या सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमानं 20 कोटींचा गल्ला जमवला. याशिवाय अभिनेत्री कियारा अडवाणीच्या अभिनयानंही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शाहिदच्या करिअर मधील हा सर्वाधिक कमाइ करणारा सिनेमा ठरण्याची शक्यता आहे. मात्र अशातच आता हा सिनेमा ऑनलाइन लीक झाल्याचं समजतं. त्यामुळे आता या सिनेमाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. VIDEO : वाऱ्याच्या वेगानं धावला सलमान खान, घोड्यालाही टाकलं मागे
कबीर सिंह रिलीज होऊन काही तास उलटत नाहीत तो पर्यंत पायरेटेड वेबसाइट तमिळ रॉकर्सवर हा सिनेमा ऑनलाइन लिक झाला आहे. हा सिनेमा ऑनलाइन लिक झाल्यानंतर अनेकांनी ही लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे. कुख्यात पायरेटेड वेबसाइट तमिळ रॉकर्सनं हा सिनेमा लीक करतानाच फ्री डाउनलोड करण्याचा दावाही केला आहे. अशाप्रकारे कोणता सिनेमा लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या अगोदरही अनेक बॉलिवूड सिनेमा तमिळ रॉकर्सने लीक केले आहेत. यात ‘दे दे प्यार दे’, ‘टोटल धमाल’ आणि ‘भारत’ सारख्या सिनेमांचा समावेश आहे. Bigg Boss 13 होस्ट करण्यासाठी सलमान खानला मिळणार एवढं मानधन
कबीर सिंह हा सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा सिनेमा साउथमध्ये सुपरहिट ठरल्यानंतर संदिप वांगा यांनी या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचं ठरवलं. त्यामुळे मूळ तेलुगू सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंह’ यांच्यात काय फरक आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. कबीर सिंह ही एका अशा प्रियकराची कथा आहे जो प्रेमात हरल्यानंतर स्वतःला पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. प्रेमातल्या वेडेपणाचा कळस गाठलेल्या या सिनेमातील शाहिद कपूरची तरुणाईमध्ये जास्त क्रेझ आहे. त्यामुळे या सिनेमाकडून शाहिदला बऱ्याच अपेक्षा आहेत. VIRAL VIDEO : ‘मलंग’च्या सेटवर स्टंटशूट दरम्यान दिशा पाटनीला दुखापत
===================================================================== VIDEO : रुग्णालयात झोपलेले असताना शर्टात घुसला साप, तरीही आजोबा ढाराढुर झोपले!