जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : वाऱ्याच्या वेगानं धावला सलमान खान, घोड्यालाही टाकलं मागे

VIDEO : वाऱ्याच्या वेगानं धावला सलमान खान, घोड्यालाही टाकलं मागे

VIDEO : वाऱ्याच्या वेगानं धावला सलमान खान, घोड्यालाही टाकलं मागे

Salman Khan सलमाननं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ त्याच्या मागच्या व्हिडिओ पेक्षा थोडा वेगळा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 जून : अभिनेता सलमान खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘भारत’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही या सिनेमाची क्रेझ पाहयला मिळाली. त्यानंतर सलमान आता त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’च्या शूटिंगच्या तयारीला लागला आहे. या सिनेमाच्या काही भागाचं शूटिंग पूर्ण झालं असून त्यानंतर उर्वरीत सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या फिटनेस आणि वर्कआउटचे व्हिडिओ शेअर करत आहे. यामागे ‘दबंग 3’ असल्याचं बोललं जात आहे. कारण या सिनेमात सलमानचे काही पहिल्या भागातील सीन आहेत. त्यामुळे सलमान आता त्याची तयार करत असून त्यानं नुकताच एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. Bigg Boss 13 होस्ट करण्यासाठी सलमान खानला मिळणार एवढं मानधन

जाहिरात

सलमाननं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ त्याच्या मागच्या व्हिडिओ पेक्षा थोडा वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये सलमान घोड्यासोबत धावताना दिसत आहे. यात सलमान सोबत झहीर इक्बाल सुद्धा दिसत आहे. झहीरनं सलमानच्या होम प्रॉडक्शनमध्ये रिलीज झालेल्या नोटबुक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या व्हिडिओमध्ये सलमान घोड्यासोबत स्पर्धा करताना दिसत आहे आणि शेवटी घोड्याच्या आधी पोहोचताना दिसत आहे. सलमानच्या व्हिडिओ चाहत्यांच्या खूपच पसंतीत उतरला आहे. दीपिकासोबत समलैंगिक रिलेशनशिपमध्ये राहायचंय, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा

नुकत्याच झालेल्या जागतिक योगा दिनाच्या निमित्तानं सलमाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो पाण्यामध्ये रिव्हर्स डाइव्ह मारताना दिसत आहे. खरं तर अशाप्रकारे रिव्हर्स डाइव्ह मारणं सामान्यतः सोपं नसतं मात्र सलमानच्या फिटनेसची बातच काही और आहे. वयाच्या 53 व्या वर्षीही त्यांचा फिटनेस भल्याभल्यांना मात देणारा आहे. सलमान आजही त्याच्या फिटनेसमुळे आजकालच्या सर्व नव्या अभिनेत्यावर भारी पडताना दिसतो. कॅटरिनाने केला हॉट डान्स, VIDEO होतोय व्हायरल!

जाहिरात

================================================== VIDEO : रुग्णालयात झोपलेले असताना शर्टात घुसला साप, तरीही आजोबा ढाराढुर झोपले!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात