मुंबई, 21 सप्टेंबर : सोशल मीडिया हे माध्यम सध्या व्यक्त होण्याचं, माहिती पोहोचवण्याचं एक उत्तम साधन झालं आहे. सध्या कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची तसंच त्यांच्या कामाची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यामातून पोहोचवत असतात. अशातच मागच्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांचे बालपणीचे, तरुणपणातील फोटो व्हायरल होत आहेत. त्या फोटोंमधील त्या कलाकारांना बऱ्याचदा ओळखणं देखील कठीण झालं आहे. प्रेक्षकही कलाकारांच्या थ्रो बॅक फोटोंना चांगली पसंती देत आहेत. असाच एका फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. त्यात दिसणारी ही अभिनेत्री तमाम महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री आहे. तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमधील तरुणीनं मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही ती या क्षेत्रात सक्रीय असून तिच्या नव्या सिनेमाचं शुटींग आटोपून नुकतीच लंडनमधून परत आलीये. सध्या ही अभिनेत्री अभिनय तर करतेच आहे तर दुसरीकडे ती निर्माती आणि दिग्दर्शिका देखील झाली आहे. अनेक मराठी मालिका आणि सिनेमांची निर्माती तिनं केली आहे. इतकंच नाही तर ऑनस्क्रिन भावुक सीन शुट करुन रडण्यात तर या अभिनेत्रीनं चांगलीच प्रसिद्ध मिळवली आहे. हेही वाचा - Alka Kubal: ‘अशोक मामांनी जमिनीवर राहायला शिकवलं’, अलका कुबलांनी सांगितल्या अविस्मरणीय आठवणी फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे माहेरची साडी फेम अलका कुबल आहे. अभिनेत्री अलका कुबल यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचा सिनेसृष्टीत पदार्पणाचा फोटो शेअर केला आहे. यात त्या फारच तरुण तजेलवाण्या दिसत आहे. त्यांचं सौंदर्य आजही कायम आहे.
अभिनेत्री अलका कुबल यांनी शेअर केलेला हा फोटो त्यांच्या 1980मधील ‘चक्र’ या पहिल्या वहिल्या सिनेमातील आहे. या सिनेमात एव्हग्रीन अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याबरोबर अलका कुबल यांनी स्क्रिन शेअर केली होती. अलका ताईंना पदार्पणातच स्मिता पाटील यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती.
अलका ताईंनी पोस्ट शेअर करत म्हटलंय, ‘जुन्या आठवणी. 1980 मधील माझा पहिला सिनेमा ‘चक्र’. या सिनेमात मला माझ्या आवडत्या अभिनेत्री स्मिता पाटील जी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती’. अलका ताईंनी शेअर केलेल्या या सुंदर आठवणीवर चाहत्यांनी देखील पसंती दर्शवली आहे.