मुंबई, 15 जुलै: नव्वदच्या दशकातील अनेक सिनेमा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहेत. त्या काळात आलेले स्त्री प्रधान सिनेमांनी महाराष्ट्राच्या घराघरातील महिलांवर्गावर राज्य केलं. अनेक सिनेमांनी तर आपला नवा रेकॉर्ड बनवला. असाच एक सिनेमा म्हणजे माहेरची साडी. अलका कुबल, रेणूका शहाणे, रमेश भाटकर, विक्रम गोखले, अजिंक्य देव, विजय चव्हाण, अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. सिनेमातील डायलॉग आणि कलाकार आजही चर्चेत आहेत. या सिनेमानं दिलेल्या भावा बहिणीची जोडी तर अजरामर आहे. अभिनेत्री अलका कुबल आणि अंजिक्य देव यांनी साकारलेली बहिण भावाची पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्या सिनेमानंतर अलका कुबल आणि अजिंक्या फार सिनेमांमध्ये एकत्र दिसले नाहीत. मात्र अनेक वर्षांनी या जोडीची ग्रेट भेट थेट लंडनमध्ये झाली. माहेरची साडी भाऊ बहिणीं थेट लंडनमध्ये एकत्र आलेत. ‘बऱ्याच दिवसांनी लंडनमध्ये भेट’, असं म्हणत अलका कुबल यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन अंजिक्या देव बरोबरचा एका फोटो शेअर केला आहे. दोघांना पाहून चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे. सासरला ही बहिण निघाली, भावाची लाडी, नेसली माहेरची साडी. दोघांचं हे गाणं चांगलंच गाजलं. आजही हे गाणं लागलं की अनेक भावा बहिणींच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. हेही वाचा - Prajakta Mali: ‘हा चित्रपट पाहिल्यावर तुमचा…’; Tamasha Live बघितल्यानंतर प्राजक्ताची प्रतिक्रिया चर्चेत
माहेरची साडी या सिनेमात अभिनेत्री अलका कुबल यांनी लक्ष्मी शिंदेची भूमिका साकारली होती. तर अंजिक्य देव यांनी लक्ष्मीच्या लहान भावाची विक्रम शिंदेची भूमिका साकारली होती. भावा बहिणींचं प्रेम सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. माझी ताई कम नशीबी नाहीये ह अंजिक्य देव यांचं वाक्य चांगलंच प्रसिद्ध आहे. अलका कुबल आणि अंजिक्य देव या ऑनस्क्रिन भाऊ बहिणींचा फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेम व्यक्त केलं आहे. अभिनेत्री अलका कुबल या सध्या लंडनमध्ये congratulations या नव्या मराठी सिनेमाचं शुटींग करत आहेत. अभिनेता लोकेश गुप्ते सिनेमाचं दिग्दर्शक करत आहे. सिनेमात आतापर्यंत अलका कुबल यांच्यासह, सिद्धार्थ चांदेकर, पुजा सावंत हे कलाकार प्रमुख भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र अलका ताईंनी शेअर केलेल्या फोटोनंतर अभिनेते अजिंक्य देव देखील सिनेमाचा भाग असल्याचं समोर आलं आहे.