Home /News /entertainment /

Alka Kubal: 'अशोक मामांनी जमिनीवर राहायला शिकवलं', अलका कुबलांनी सांगितल्या अविस्मरणीय आठवणी

Alka Kubal: 'अशोक मामांनी जमिनीवर राहायला शिकवलं', अलका कुबलांनी सांगितल्या अविस्मरणीय आठवणी

आज झी मराठीवर ‘बहुरंगी अशोक’ हा खास कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे. अशोक सराफ यांच्या काही आठवणींना अलका कुबल यांनी उजाळा दिला आहे.

  मुंबई 3 जुलै: अशोक सराफ (Ashok Saraf) यांची कारकीर्द आजच्या च नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अशोक मामांचा या वर्षी 75 वा वाढदिवस साजरा झाला. अशोक सराफ यांनी अमृत महोत्सवी वर्षात अनेक कलाकृतींमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यांच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी आज सगळी इंडस्ट्री एकत्र येणार असून झी मराठीवर आज ‘बहुरंगी अशोक’ (Bahurangi Ashok) हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या आधी अनेक कलाकारांनी मामांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अलका कुबल यासुद्धा मामांबद्दल बोलक्या झाल्या आहेत. (Alka Kubal) अलका कुबल यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं नाव कमावलं आहे. (Alka Kubal- Ashok Saraf) अलका कुबल आणि अशोक सराफ यांनी बरेच हिट चित्रपट एकत्र केले आहेत. अशोक मामांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अलका कुबल यांनी मामांचे काही किस्से शेअर केले. “सुपरस्टार हे खरोखरच अशोक मामा होते आणि आहेत. मी तुझ्यावाचून करमेना ही फिल्म मामांसोबत केली ती माझी आणि त्यांची पहिली फिल्म होती. त्या चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळाला त्याचं श्रेय सुद्धा मामाचं आहे. त्या सिनेमानंतर मला सीन मध्ये कन्टेन्ट काय आहे? आपण त्यात काय जागा काढू शकतो, डायलॉग कसे म्हणले पाहिजे हे सगळं मामांमुळेच समजलं. माझं विद्यापीठ हे मामा आहेत. त्यांनी कायम जमीनीवर कसं राहावं हे शिकवलं.”
  त्यांच्यासोबतच किस्सा शेअर करताना त्या सांगतात, “आम्ही एक पावसातलं गाणं शूट करत होतो. जानेवारी महिना आणि पुण्यात कडाक्याची थंडी. तेव्हा विहिरीतून पाईप लावून आमच्यावर पाण्याचा फवारा केला जात होता. आणि मी अक्षरशः कुडकुडत होते एवढी थंडी मला वाजत होती. हे ही वाचा- Shreya Bugde: खऱ्या करीनाला लाजवेल अशी ही थुकरटवाडीची 'अवली बेबो', VIDEO बघाच
   थोडंसं अंग वाळलं की पुन्हा पाणी मारलं जात होतं. मी अक्षरशः रडकुंडीला आले होते. त्या सिनेमात सुद्धा माझे ओठ थरथरताना दिसत आहेत. त्यावेळी मामांनी मला खूप धीर दिला. आज तेच गाणं मी या कार्यक्रमात सादर करणार आहे याचा आनंद आहे. त्यांची ही एनर्जी आणि उत्साह आयुष्यभर टिकू दे एवढीच प्रार्थना करते.”
  फक्त अलका कुबलचं नाही तर अनेक कलाकारांनी आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. प्रत्येकांसाठी अशोक मामा एक विद्यापीठ आहेत. आणि ते कायम तसेच राहावे त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद असाच घेता यावा एवढीच सगळ्यांची इच्छा आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  पुढील बातम्या