मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alka Kubal: माहेरची साडी स्टाईलमध्ये अलका ताईचं सेंड ऑफ; टीमने केलं झकास सेलिब्रेशन

Alka Kubal: माहेरची साडी स्टाईलमध्ये अलका ताईचं सेंड ऑफ; टीमने केलं झकास सेलिब्रेशन

तीस वर्षांपूर्वी आलेल्या माहेरच्या साडी सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. सध्या या सिनेमातील गाण्यावर लक्ष्मी अर्थात अलका कुबल यांचा व्हिडिओ बराच viral होताना दिसत आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 01 ऑगस्ट: माहेरची साडी सिनेमातून एक न पुसली जाणारी ओळख आणि स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री म्हणजे (alka kubal maherchi sadi) अलका कुबल. आज कावळपास तीस वर्षानंतरही अलका यांना माहेरच्या साडीमुळे अवघा महाराष्ट्र ओळखतो. सध्या याच सिनेमातील एका गाण्यावर अलका यांचा एक व्हिडिओ बराच viral होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अलका यांचा शूटिंगचा शेवटचा दिवस असून अख्खी टीम मिळून त्यांचं सेंड ऑफ करताना दिसत आहे. त्यांच्या शेवटच्या दिवशी ‘सासरला ही बहीण निघाली, भावाची लाडी, नेसली माहेरची साडी’ हे सिनेमातलं स्पेशल गाणं लावून टीमने त्यांचं सेंड ऑफ केल्याचं दिसून येत आहे. लोकेश गुप्ते यांनी एक खास व्हिडिओ शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. त्यात ते असं म्हणतात, “Send off to Everyone’s Fav Alka Tai @alkakubal_23 अलका ताई तुमच्या सोबत काम करुन एक वेगळेच समाधान मिळाले माझ्या संपूर्ण टीम ला ...खूप काही शिकायला मिळाले ...तुमची काम करण्याची पद्धत , एनर्जी , कामाप्रती असलेली तुमची श्रद्धा सगळेच Hatsoff 🙌🙏🏻खूप काम करायचे आहे तुमच्याबरोबर भविष्यात सुद्धा ...Thank you so much Alka tai for doing this film for me and my team… Love you Alka tai❤️”
माहेरची साडी नंतर सुद्धा अलका कुबल यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून आपली एक वेगळी छाप सोडली आहे. त्यांनी आत्तापर्यंत समोर आणलेली स्त्रीची वेगवेगळी रूपं आणि त्यांची पात्रं आजही ओळखली जातात. सध्या त्यांच्या नव्या सिनेमाची बरीच चर्चा होत आहे. ‘Congratulations’ नावाच्या सिनेमांत त्या येत्या काळात झळकताना दिसणार आहेत. लोकेश गुप्ते यांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा असून यामध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावन्त असे कलाकार सुद्धा दिसणार आहेत. हे ही वाचा- Urmila Nimbalkar: प्रेग्नंसीदरम्यान उर्मिलाने 'त्या' कटू प्रसंगाला दिलं तोंड; आठवणी शेअर करताना अश्रू अनावर या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये सुरु आहे. मागच्या काही काळात या टीमने बरीच ऑफ स्क्रीन धमाल करतानाचे क्षण शेअर केले होते. एका व्हिडिओमध्ये अलका कुबल स्वतः सगळ्या टीमसाठी स्वयंपाक करताना दिसत होत्या. एकूणच या टीमची एकत्र बरीच गट्टी जमल्याचं दिसून आलं होतं. तर आज अलका यांना निरोप देताना शूट केलेला हा व्हिडिओ अनेकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या