मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Koffee With Karan 7: अशी झाली आलिया रणबीरची दुल्हनिया, केलं होतं हटके स्टाइल प्रपोज?

Koffee With Karan 7: अशी झाली आलिया रणबीरची दुल्हनिया, केलं होतं हटके स्टाइल प्रपोज?

आलिया भट्टने तिच्या आणि रणबीरच्या लव्हस्टोरीला (Alia and Ranbir proposal story) नेमकी सुरुवात कशी झाली आणि तिला रणबीरने कसं प्रपोज केलं याबद्दल कॉफी विथ करण (KWK season 7) या कार्यक्रमाच्या नव्या सीजनमध्ये अनेक गोष्टी शेअर केल्या.

आलिया भट्टने तिच्या आणि रणबीरच्या लव्हस्टोरीला (Alia and Ranbir proposal story) नेमकी सुरुवात कशी झाली आणि तिला रणबीरने कसं प्रपोज केलं याबद्दल कॉफी विथ करण (KWK season 7) या कार्यक्रमाच्या नव्या सीजनमध्ये अनेक गोष्टी शेअर केल्या.

आलिया भट्टने तिच्या आणि रणबीरच्या लव्हस्टोरीला (Alia and Ranbir proposal story) नेमकी सुरुवात कशी झाली आणि तिला रणबीरने कसं प्रपोज केलं याबद्दल कॉफी विथ करण (KWK season 7) या कार्यक्रमाच्या नव्या सीजनमध्ये अनेक गोष्टी शेअर केल्या.

पुढे वाचा ...
  मुंबई 8 जुलै: बॉलिवूडच्या एका सेलिब्रेटेड जोडप्याने म्हणजेच आलिया आणि रणबीरने (Alia Bhatt & Ranbir Kapoor wedding) नुकतंच एप्रिल महिन्यात लग्न केलं. त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा गेली अनेकवर्ष होत होती. या जोडप्याने काही वर्ष डेट केल्यानंतर अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं. आलिया आणि रणबीरच्या या लग्नसोहळ्याची तुफान चर्चा झाली होती. आलियाने कॉफी विथ करण शो (Koffee With Karan season 7) मध्ये रणबीर आणि तिच्या लव्हस्टोरीबद्दल (Alia and Ranbir lovestory) नुकताच खुलासा केला. रणबीरने तिला कशा पद्धतीने प्रपोज केलं याबद्दल तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. “मला माझे अनेक मित्रमैत्रिणी सांगत होते की माझी आणि रणबीरची जोडी छान दिसेल आणि आमच्यात काहीतरी प्रेमळ नातं तयार होईल. पण मला त्यावर खूप विचार करून माझी शक्ती वाया घालवायची नव्हती. जे व्हायचं ते आपोआप नैसर्गिकरित्या होईल असं माझं मत होतं आणि ते तसंच घडलं” रणबीर आणि आलिया ब्रह्मास्त्र सिनेमाच्या वर्कशॉपसाठी तेल अवीवला जाणार होते आणि दोघेही एकत्र विमानाने प्रवास करणार होते. रणबीर आलियाच्या शेजारी बसणार असल्याने ती फार आनंदी आणि उत्सुक होती असं ती या शोमध्ये सांगते. अचानक त्याच्या सीटमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि त्याची सोया दुसरीकडे करावी लागेल अशी शक्यता निर्माण झाली. तेव्हा आलिया म्हणाली, “तो माझ्या बाजूला बसणार नाही असं वाटायला लागल्यावर मी विचार केला का माझं स्वप्न एवढ्या लवकर भंग पावणार आहे? पण त्याची सीट नीट करून देण्यात आली आणि तो माझ्याच बाजूला बसला. तिथून आमच्या लव्हस्टोरीला सुरवात झाली आणि पुढे जे घडलं ते सर्वानाच माहित आहे.” रणबीरने तिला कशा पद्धतीने प्रपोज केलं (Alia Bhatt and Ranbir Kapoor proposal) याचे तिने काही मोजके डिटेल्स शेअर केले. त्या कशाची आठवण करत ती सांगते, “मला अजिबात वाटलं नव्हतं की मला तो अशा पद्धतीने प्रपोज करेल. आम्ही याबद्दल काहीवेळा बोललो होतो पण त्यानंतर आलेल्या महामारीमुळे अनेक गोष्टींना उशीर होत गेला त्यामुळे आम्ही दोघांनीही जेव्हा व्हायचं तेव्हा आपोआप होईल असं ठरवून यावर फार चर्चा न करायचा निर्णय घेतला. हे ही वाचा- Koffee with Karan season 7 : आलियाची एंगेजमेंट रिंग आहे खूपच स्पेशल, मोठ्या डायमंडवर रणबीरचं नाव नाही तर कोरलाय 'हा' शब्द आणि ते तसंच झालं. त्याने कोणालाही न सांगता प्रपोज करायचं ठरवलं. आम्हा दोघांसाठीही स्पेशल असणाऱ्या ‘मसाई मारा’ नावाच्या जागी त्याने मला प्रपोज केलं.जंगलात मधोमध हे खूपच अनपेक्षित आणि गोड प्रपोजल होतं. आणि एवढंच नव्हे तर त्याने आलेल्या गाईडकडून या क्षणांचे फोटोसुद्धा काढून घेतले. माझ्यासाठी हा एक अत्यंत स्पेशल क्षण होता.”
  काही दिवसांपूर्वी आलियाच्या सासूबाई म्हणजे नीतू कपूर यांनी आलिया रणबीरचा एक गोड फोटो शेअर केला होता ज्यामध्ये रणबीरच्या हातात अंगठीचा बॉक्स दिसून येत आहे. यावरून फॅन्सना अशी शंका आली होती की हा फोटो प्रपोज केलेल्या दिवसाचा असू शकतो. आलिया कॉफी विथ करणच्या मंचावर या प्रपोजल स्टोरीबद्दल तसंच त्यांच्या छोटेखानी लग्नाबद्दल सुद्धा बरंच काही बोलताना दिसली.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Alia Bhatt, Bollywood News, Cute couple, Love, Love story, Marriage, Proposal, Ranbir kapoor

  पुढील बातम्या