मुंबई, 8 जुलै : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं. यानंतर आलियाने आपण प्रेग्नंट असल्याचीही घोषणा केली असून या दोघांचा सिनेमाही लवकरच रिलीज होत आहे. हे सगळं सुरु असलं तरी आलिया भट्ट (Alia Bhatt ring) आता आणखी वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हे कारण आहे, तिची डायमंड रिंग. ‘कॉफी विथ करण’ (Koffee with Karan season 7) या चॅट शोमध्ये आलियाने या अंगठीबाबत बरीच माहिती दिली. या कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंहदेखील (Ranveer Singh) तिच्यासोबत उपस्थित होता. ‘कॉफी विथ करण’ या सेलिब्रिटी चॅट शोचा सातवा सीझन सुरू झाला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर याचा पहिला एपिसोड (Koffee with Karan 7 first episode) नुकताच रिलीज झाला. या एपिसोडमध्ये करण जोहरसोबत रणवीर सिंह आणि आलिया भट हे दोघे उपस्थित होते. या वेळी या दोघांनी आपापल्या पर्सनल लाईफबद्दल बऱ्याच गोष्टी उघड (Ranveer and Alia in Koffee with Karan) केल्या. यातच आलियाने आपल्या खास अंगठीबाबत देखील माहिती दिली. हेही वाचा - Avika Gor: ‘बालिका वधू’ फेम अविका गौर ‘या’ व्यक्तीला करतेय डेट; अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे रिअल हिरो काय खास आहे त्या अंगठीत? या शोमध्ये बोलताना करण जोहरने आलियाला तिच्या एंगेजमेंट रिंगबद्दल (Alia Bhatt engagement ring) विचारलं. त्यावेळी तिने ही अंगठी आपल्यासाठी अगदीच खास असल्याचं सांगितलं. यातील हिरा अगदी मोठा आहे, तसंच या अंगठीवर ‘मिसेस हिपस्टर’ (Mrs Hipster) हे शब्द कोरण्यात आले आहेत. यावर असं का लिहिलं आहे हे सांगण्यास मात्र आलियाने नकार दिला. मात्र, हे शब्द तिच्या आयुष्यातील खास गोष्टी आणि किस्स्यांशी निगडित आहेत असं तिने सांगितलं. ही रिंग (Alia Bhatt diamond ring) आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असल्याचंही तिने या वेळी म्हटलं.
कसा आहे शोचा हा सीझन ‘कॉफी विथ करण’चा हा सीझन अनस्क्रिप्टेड असल्याचं सांगण्यात आलं आहे. करणने खरं तर यावेळी कित्येक सेलिब्रिटींना जोडीने येण्याचं आमंत्रण दिलं होतं, मात्र त्यांनी नकार दिला. करणला या गोष्टीचं वाईट वाटलं, मात्र सेलिब्रिटिंनादेखील पर्सनल स्पेस मिळायला हवी हेही तितकंच खरं आहे. या सीझनमध्ये गेस्ट म्हणून येणारे सेलिब्रिटी करणला प्रश्न विचारू शकत नाहीत हे स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, कित्येक सेलिब्रिटींच्या कमेंट्स त्यांच्या विनंतीनुसार एडिट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर आणि आलियाने खूप धमाल केली. हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांनी अद्याप पडद्यावर एकत्र काम केलं नसलं, तरी खऱ्या आयुष्यात हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं, तर ते एकमेकांचे ‘सखी’ आहेत.