मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'दोन देशांच्या...'; आलिया-रणबीरच्या लेकीसाठी पाकिस्तानी अभिनेत्याची खास पोस्ट

'दोन देशांच्या...'; आलिया-रणबीरच्या लेकीसाठी पाकिस्तानी अभिनेत्याची खास पोस्ट

आलिया-रणबीर कपूर

आलिया-रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी रविवारी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. आपल्या मुलीच्या जन्मामुळे दोघेही खूप आनंदी आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट  आणि  रणबीर कपूर यांनी रविवारी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. आपल्या मुलीच्या जन्मामुळे दोघेही खूप आनंदी आहेत. दोघेही त्यांच्या आयुष्यातील या नव्या टप्प्याचा आनंद घेत आहेत.त्याचवेळी, सेलेब्स आणि त्यांचे चाहते पहिल्यांदाच आई-वडील झालेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे अभिनंदन करत आहेत. अशातच पाकिस्तान अभिनेता आणि होस्ट यासिर हुसैननं आलियाच्या लेकीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेटकरी अभिनेत्याच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

यासिरने आलिया आणि रणबीरला त्यांच्या मुलीच्या जन्माबद्दल शुभेच्छा देण्याऐवजी पाकिस्तान आणि भारतावर भाष्य केले आहे. यासिरने पोस्टमध्ये म्हटलं की, यासिर म्हणाला, 'म्हणूनच आज कबीर खूप आनंदी आहे. दोन देशांच्या मैत्रीसाठी मी तयार आहे'. त्याच्या या पोस्टविषयी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक नेटकरी म्हणाले, यासिरनं या पोस्टच्या माध्यमातून आलिया-रणबीरच्या मुलीला आपल्या मुलीसाठी मागणी घातली आहे, असं अनेक नेटकरी म्हणत आहेत.

यासिर पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री इकरा अजीजचा नवरा देखील आहे. इकरा आणि यासिरनं 2019 मध्ये ग्रॅंड वेडिंग केलं होतं.यासिर हुसेन हा पाकिस्तानी मनोरंजन सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि त्याने चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. सध्या त्याच्या पोस्टने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. त्याच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होतायेत.

दरम्यान, आलिया आई बनल्यापासून सोशल मीडियावर एकच चर्चा पहायला मिळतेय ती कपूर कुटुंबियांची. भट्ट आणि कपूर कुटुंबीय नातीच्या आगमनाने भारावून गेले आहेत. बॉलिवूडपासून हॉलिवूडकरांनी आलिया-रणबीरला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood News, Pakisatan, Ranbir kapoor