मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॉलिवूडमध्येही 'कोरोना'ची दहशत, अक्षय कुमारला बसला मोठा फटका

बॉलिवूडमध्येही 'कोरोना'ची दहशत, अक्षय कुमारला बसला मोठा फटका

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री लवकर झोपणं. त्याचं असं म्हणणं आहे की रात्री लवकर झोपल्यानं सकाळी लवकर उठायला मदत होते आणि ठरलेला दिनक्रम पाळता येतो. त्यामुळे अक्षय रात्री 9पर्यंत झोपतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री लवकर झोपणं. त्याचं असं म्हणणं आहे की रात्री लवकर झोपल्यानं सकाळी लवकर उठायला मदत होते आणि ठरलेला दिनक्रम पाळता येतो. त्यामुळे अक्षय रात्री 9पर्यंत झोपतो.

कोरोनाच्या भीतीमुळे जगभरातील काही चित्रपटांचं शूटिंग तर रद्द करण्यात आलं आहेच, पण काही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बॉलिवूडला देखील याचा मोठा फटका बसणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 12 मार्च : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी कोरोना व्हायरस जगभरामध्ये तीव्रतेने पसलेला साथीचा रोग (pandemic) संबोधले आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार हा रोग तीव्रतेने जगभरामध्ये पसरत आहे. जवळपास 100 देशांना कोरोनाचा फटका बसला असून आर्थिक स्तरावर मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे चित्रपट आणि एकंदरित मनोरंजन व्यवसायाला देखील याचा फटका बसला आहे. जगभरातील काही चित्रपटांचं शूटिंग तर रद्द करण्यात आलं आहेच, पण काही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

(हे वाचा-कोरोनाची दहशत : 'या' राज्यात शाळा, कॉलेजसह चित्रपटगृहेसुद्धा 31 मार्चपर्यंत बंद)

COVID-19 च्या प्रादुर्भावामुळे अक्षय कुमारचा (Akshay Kumar) सिनेमा सूर्यवंशीच्या प्रदर्शनाची तारीख (Sooryanshi release date) पुढे ढकलण्यात आली आहे. अक्षय कुमारने यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘आम्ही हा चित्रपट खूप उत्सुकतेने प्रेक्षकांसाठी आणू इच्छितो, पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे निर्मात्यांनी सूर्यवंशीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. योग्य वेळ आल्यावर चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. शेवटी सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे.’ असं ट्वीट करत अक्षय कुमारचे चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे.

(हे वाचा-ऑनलाइन शॉपिंगही नको! प्लास्टिक पॅकेजिंगमधूनही येऊ शकतो कोरोना व्हायरस)

रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’24 मार्चला प्रदर्शित होणार होता. सूर्यवंशीप्रमाणेच रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) ’83’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. कपिल देव यांच्या जीवनावर आधारित ‘83’ हा सिनेमा 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मात्र 83 बाबत अद्याप कोणती घोषणा करण्यात आलेली नाही आहे. हॉलिवूडबाबत बोलायचं झाल्यास, जेम्स बाँड फिल्म ‘नो टाइम टू डाय’ (No time to die) आणि सोनी पिक्चर्सची ‘पीटर रॅबिट 2’ (Peter Rabbit 2) यांच्या प्रदर्शनाची तारीख देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

(हे वाचा-'कोरोना'मुळे शेअर बाजार गडगडला, जाणून घ्या घसरण होण्याची 5 महत्त्वाची कारणं)

त्याचप्रमाणे चित्रपटांचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. सलमान खान (Salman Khan) ची अपकमिंग फिल्म 'राधे: युअर मोस्ट वाँटेड भाई' (Radhe: Your Most Wanted Bhai), अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'पृथ्वीराज' (Prithviraj) आणि करण जोहर (Karan Johar) ची अपकमिंग फिल्म 'तख्त' (Takht) ची शूटिंग थांबवण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या पृथ्वीराजचं शूटिंग राजस्थानमधून मुंबईत हलवण्यात आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Rohit Shetty