'कोरोना'मुळे शेअर बाजार गडगडला, जाणून घ्या घसरण होण्याची 5 महत्त्वाची कारणं

'कोरोना'मुळे शेअर बाजार गडगडला, जाणून घ्या घसरण होण्याची 5 महत्त्वाची कारणं

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाव्हायरस (Coronavirus) जगभरात पसरलेला साथीचा रोग असल्याचं जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मार्च : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाव्हायरस (Coronavirus)जगभरात पसरलेला साथीचा रोग असल्याचं जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. शेअर्चची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये घसरण होत आहे. आज सेन्सेक्स तब्बल 2919 अंकांनी घसरला असून निफ्टी 730 अंकानी घसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील (Share Market) चिंता वाढत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) मोठ्या म्हणजे तब्बल 1600 अंकानी गडगडला. तर दुसरीकडे निफ्टीमध्येही (Nifty) 470 अंकाची घसरण झाली होती.

(हे वाचा- भारतात 3 गुहांमध्ये लाखो टन कच्च्या तेलाचा साठा, केंद्राचा महत्त्वाचा निर्णय)

शेअर बाजार बंद होत असताना निर्देशांकात 2919  अंकांची घसरण नोंदवली गेली असून, सेन्सेक्स 32778.14 अंकांवर बंद झाला आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेल्या घसरणीमुळे काही सेकंदात 10 लाख 98 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची 5 कारणं

कोरोना व्हायरस (Coronavirus): जागतिक आरोग्य संघटनेने नवीन कोरोनाव्हायरस साथीचा रोग असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. बहुतांश देशांवर याचा परिणाम झाला आहे. जगभरात 100 देशांना कोरोनाच्या संकटाने वेढलं आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढून 1 लाख 24 हजारांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4 हजार 500 जणं मृत्यूमुखी पडले आहेत.

वाहतुकीवर बंदी: भारतामध्ये कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात प्रवेश करण्यासाठी यापूर्वी देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. 15 एप्रिलपर्यंत कोणत्याही विदेशी पर्यटकाला किंवा नागरिकाला भारतात प्रवेश दिला जाणार नाही आहे.

(हे वाचा-सावधान ! मास्कनंतर आता हँड सॅनिटायझरही बनावट, कारखान्यावर छापा)

भारतामध्ये आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतुकीवर सुद्धा काही प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने शुक्रवारी UK वगळता युरोपमधील सर्व प्रवाशांवर पुढील 30 दिवसांसाठी बंदी आणली आहे. यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे.

FII कडून सतत शेअर्सची विक्री: विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign institutional investors- FII) सतत भारतीय शेअर्सची विक्री करत आहेत. देशांतर्गत बाजारातून त्यांनी केवळ मार्च महिन्यामध्येच 20 हजार 831 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.

बाँड मार्केटमध्ये अनिश्चितता :रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या काळात मांडलेल्या काही प्रतिकूल प्रस्तावांमुळे बाँड मार्केटमधील अनिश्चितता वाढली आहे. येस बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीआयने additional tier I (AT1) bonds चा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे म्युच्यूअल फंड्समध्ये गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ शकतं.

जागतिक बाजारात वाढलेली शेअर्सची विक्री : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री होत आहे. जपान बाहेरील एमएससीआयचा आशिया-पॅसिफिक शेअर्सचा विस्तृत निर्देशांक 3.2 टक्क्यांनी घसरला. या निर्देशांकाने गाठलेली हा निच्चांक आहे. तर जपानचा Nikkei 5.3 टक्क्यांनी कोसळला आहे. अमेरिकेतील बाजाराताही कोरोनाची भीती आहे.  Dow 1464 अंकांनी घसरला आहे. 500 ही 5 140.85 अंकानी घसरला आहे तर Nasdaq 392.20 अंकांनी घसरला आहे.

First published: March 12, 2020, 4:05 PM IST
Tags: BSEnse

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading