जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Akshay Kumar: हेरा फेरी 3 नंतर 'हा' सिनेमाही गेला अक्षयच्या हातून; दिग्दर्शकांनी केली मोठी घोषणा

Akshay Kumar: हेरा फेरी 3 नंतर 'हा' सिनेमाही गेला अक्षयच्या हातून; दिग्दर्शकांनी केली मोठी घोषणा

अक्षय कुमार

अक्षय कुमार

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारसाठी मागचं वर्ष फार चांगलं गेलं नाही. आता या वर्षाच्या सुरुवातीलाच अक्षय बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 जानेवारी:  बॉलीवूड अभिनेता  अक्षय कुमार साठी मागचं वर्ष फार चांगलं गेलं नाही. 2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘सूर्यवंशी’नंतर तो अद्याप एकही हिट चित्रपट देऊ शकलेला नाही. त्यातच ‘हेरा फेरी 3’ सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांची फ्रेंचायझीही त्याच्या हातातून गेली आहे. नुकतेच वर्ष सुरू झाले असून अक्षयला आणखी एक धक्का बसला आहे. त्याचा बहुचर्चित चित्रपटावर स्थगिती आली आहे. हा चित्रपट म्हणजे  ‘गोरखा’. त्याने ‘गोरखा’ चित्रपट सोडल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र आता दिग्दर्शक आनंद एल राय यांनी चित्रपट स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यामागचे कारणही त्यांनी उघड केले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते की अक्षय कुमारने गोरखा चित्रपट करण्यास नकार दिला आहे, परंतु आता चित्रपट निर्माते आनंद एल राय यांनी देखील चित्रपट स्थगित केल्याची पुष्टी केली आहे. तांत्रिक समस्येमुळे तो ‘गोरखा’ बनवत नसल्याचे त्याने बॉलीवूड हंगामाला सांगितले आहे. अक्षय कुमारने चित्रपट सोडल्याचे वृत्त खरे नसल्याचेही आनंद एल राय म्हणाले. हेही वाचा - Katrina-Vicky : डोक्यावर पदर अन खांद्यावर उपरणं; कतरिना कैफ देसी अंदाजात पोहचली सिद्धिविनायक मंदिरात याआधी 2021 मध्ये अक्षय कुमारने सोशल मीडियावर ‘गोरखा’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला होता. त्यानंतर एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने पोस्टरमधील चूक पाहिली आणि त्याबद्दल ट्विट केले. त्यांनी लिहिले, ‘प्रिय अक्षय कुमार जी, हा चित्रपट बनवल्याबद्दल माजी गोरखा अधिकारी म्हणून धन्यवाद. तथापि, तपशील महत्त्वाचे आहेत. कृपया खुकरी दुरुस्त करा. तीक्ष्ण धार दुसऱ्या बाजूला आहे. ही तलवार नाही. ब्लेडच्या आतून खुकरीचा वार होतो.

जाहिरात

याला उत्तर देताना अक्षय कुमारने ट्विट केले होते की, ‘प्रिय मेजर जॉली, याकडे माझे लक्ष वेधण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. चित्रपटाचे शूटिंग करताना आम्ही खूप काळजी घेऊ. गुरखा असल्याचा मला खूप अभिमान आहे. हा चित्रपट वास्तविक वाटण्यासाठी आणि वास्तवाच्या जवळ आणण्यासाठी कोणत्याही सूचनांचे कौतुक केले जाईल.’ गोरखा हा एक बायोपिक चित्रपट होता, ज्यामध्ये अक्षय कुमार 1971 च्या युद्ध नायक मेजर जनरल इयान कार्डोझीची भूमिका साकारणार होता.  इयान कार्डोझी गोरखा रेजिमेंटचे अधिकारी होते. मिळालेल्या माहितीनुसार, युद्धादरम्यान मेजर जनरल इयान कार्डोझी यांचा पाय लँडमाइनवर पडला, त्यानंतर त्यांनी स्वत:चा पाय कापला.

News18लोकमत
News18लोकमत

2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘सूर्यवंशी’नंतर अक्षय कुमारचे बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले. यामध्ये ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘कठपुतली’, ‘राम सेतू’ यांचा समावेश आहे. 2023 सालाबद्दल बोलायचे झाले तर अक्षयकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तो ‘सेल्फी’मध्ये दिसणार आहे. त्याच्याकडे ‘OMG 2’ देखील आहे. तो ‘सूरराई पोत्रू’ या साऊथ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. त्याच्याकडे कॅप्सूल गिल आणि वेदात मराठे वीर दौडले सात हा मराठी चित्रपटही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात