मुंबई, 17 डिसेंबर : सलमान खान आणि अक्षय कुमार हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि कमाई करणारे कलाकार आहेत. एक म्हणजे बॉलीवूडचा दबंग, आणि दुसरा खिलाडी. दोघेही इंडस्ट्रीतील सर्वात महागडे कलाकार मानले जातात. विशेष म्हणजे त्यांची मैत्रीही खूप घट्ट आहे. दोघांनी ‘मुझसे शादी करोगे’ आणि ‘जान-ए-मन’मध्ये एकत्र काम केले आहे. दोघेही अनेकदा वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात एकमेकांना चिअर अप करताना दिसतात. आता पुन्हा एकदा सलमानने त्यांच्या मैत्रीची झलक दाखवली आहे. नुकतंच सलमानने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय रडताना दिसत आहे. तर सलमानने त्याचं कौतुक केलं आहे. सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करून अक्षय कुमारचं कौतुक केले आहे. तसंच त्याच्यासाठी एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी संदेश लिहिला आहे. खरंतर अक्षय कुमारचा हा व्हिडीओ आताचा नसून हा एक जुना व्हिडिओ आहे. ज्यामध्ये एका कार्यक्रमात अक्षय रडतो आहे. आता तो व्हिडीओ सलमानने शेअर करत त्यावर प्रेमाची उधळण केली आहे. हा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हेही वाचा - Ritesh Genelia Exclusive: जेनेलिया नाही तर ही होती रितेशचं पाहिलं प्रेम; अभिनेत्याने सांगितला पहिल्या प्रेमाचा तो किस्सा हा व्हायरल व्हिडिओ एका रिअॅलिटी शोचा आहे ज्यामध्ये अक्षयची बहीण अलका भाटियाने त्याला एक ऑडिओ संदेश पाठवला, जो ऐकताना अक्षयच्या डोळ्यात पाणी आले. व्हिडीओ शेअर करताना सलमान खानने लिहिले की, “मी नुकतेच असे काही पाहिले आहे, जे सर्वांसोबत शेअर करावे असे मला वाटले. देव तुला आशीर्वाद देईल अक्की, खरोखर आश्चर्यकारक, हे पाहून खूप आनंद झाला. तंदुरुस्त राहा, काम करत राहा आणि देव तुमच्या पाठीशी असेल भाऊ.’’
त्याचवेळी अक्षय कुमारने सलमान खानने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेला व्हिडिओही पोस्ट केला आहे. ही पोस्ट करत त्याने सलमानच्या मेसेजला रिप्लाय दिला. त्याने लिहिले की, “तुझ्या या मेसेजमुळे खूप धीर मिळाला सलमान. देव तुम्हालाही आशीर्वाद देवो. चमकत राहा.’’ आता बॉलिवूडच्या या बड्या अभिनेत्यांमधील ही प्रेमळ मैत्री पाहून चाहते भारावले आहेत.
दरम्यान दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर येणाऱ्या काळात अक्षय मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर इम्रान हाश्मी सोबत ती ‘सेल्फी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. तर सलमान खान आगामी काळात ‘किसी का भाई किसी कि जान’, ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे.