Home /News /entertainment /

‘मी त्याचे पाय तोडले; आता चालणंही कठीण झालं आहे’, सैफशी भांडणाबाबत अजयचा खुलासा

‘मी त्याचे पाय तोडले; आता चालणंही कठीण झालं आहे’, सैफशी भांडणाबाबत अजयचा खुलासा

'तान्हाजी' सिनेमाच्या रिलीजनंतर सैफ अली खाननं या सिनेमात दाखवण्यात आलेला इतिहास हा चुकीचा आहे असं वक्तव्य केलं होतं. या संबंधी अजयला सूर्यवंशीच्या ट्रेलर लॉन्चमध्ये एका प्रश्न विचारला गेला.

  मुंबई, 04 मार्च : अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'सूर्यवंशी' या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. यावेळी या ट्रेलर लॉन्चला सिनेमाच्या स्टार कास्टसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंह यांनीही हजेरी लावली. यावेळी एका पत्रकारानं अजय देवगणला सैफ अली खानबद्दल एक प्रश्न विचारला जो त्यांच्या सिनेमा ‘तान्हाजी’च्या संदर्भात होता. ज्याचं उत्तर देताना अजय असं काही म्हणाला की, सर्व उपस्थितही हैराण झाले. अजयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'तान्हाजी' सिनेमाच्या रिलीजनंतर सैफ अली खाननं या सिनेमात दाखवण्यात आलेला इतिहास हा चुकीचा आहे असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर अजय देवगण आणि सैफ यांच्यात भांडण झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर पसरलं होतं. यासंबंधीत एक प्रश्न पत्रकारानं अजयला 'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लॉन्चमध्ये विचारला. त्यावर उत्तरादखल अजय म्हणाला, 'हो आमची खूप भांडणं झाली आणि मी त्याला खूप मारलं. त्याचे हात-पाय तोडले. ज्यामुळे आता त्याला चालणंही कठीण झालं आहे. या अशा गोष्टी तुम्हाला कोण सांगतं मला समजत नाही मी काय बोलू. आमच्या दोघांत असं कोणत्याही प्रकारचं भांडण नाही आमची मैत्री जशी अगोदर होती तशीच आताही आहे. या सर्व केवळ अफवा आहेत.' मुंबईची राजभाषा मराठीच! मनसेच्या दणक्यानंतर हिंदी मालिकेचे निर्माते नरमले
  'तान्हाजी' सिनेमा रिलीज झाल्यानंतर एका मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला होता, 'तान्हाजी' सिनेमात दाखवलेला इतिहास हा चुकीचा आहे. फक्त सिनेमाच्या व्यवसायिक यशासाठी आपण इतिहासाचा चुकीचा वापर करू शकत नाही. अर्थात यामागे सुरू असलेल्या राजकारणाचा तथ्यांशी काहीही संबंध नाही. मी एक अभिनेता आणि भारतीय नागरिक म्हणून याच्यशी सहमत नाही. मी याआधीही अशा राजनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुढच्या सिनेमाच्या वेळी मी अशा कथांच्या बाबतीत अधिक सतर्क राहीन.' 'त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि...', रश्मी देसाईचा गौप्यस्फोट
  सैफ अली खानच्या या मुलाखती नंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर सैफ आणि अजय देवगण यांच्यातही वाद झाल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र आता अजयनं असं उत्तर देऊन सर्वं ट्रोलर्सना गप्प केलं आहे. या सिनेमात सैफनं उदयभान राठोडची भूमिका साकारली होती. 'तान्हाजी' सिनेमाच्या रिलीजला 50 दिवस पूर्ण झाले असून 278 कोटींचं कलेक्शन केलं आहे. श्वेता तिवारीच्या मुलीचे हॉट फोटो VIRAL, कियारा अडवाणीच्या TOPLESS फोटोला टक्कर
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Ajay devgan, Bollywood, Saif Ali Khan

  पुढील बातम्या