Home /News /entertainment /

Gangubai Kathiawadi trailer आधी अजय देवगणचा लूक रिलीज, पण भूमिका गुलदस्त्यात

Gangubai Kathiawadi trailer आधी अजय देवगणचा लूक रिलीज, पण भूमिका गुलदस्त्यात

Gangubai Kathiawadi Ajay Devgn

Gangubai Kathiawadi Ajay Devgn

Gangubai Kathiawadi trailer: संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’(Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर त्याचा ट्रेलर 4 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्टशिवाय अजय देवगण(ajay devgn) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी: संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ नवा पोस्टर नुकताच आलियाने शेअर केला आणी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे याची माहिती दिली. आणि विशेष म्हणजे चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचे पोस्टर पहिल्यांदाच रिलीज करण्यात आले आहे. आलियानं गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर केला आहे. आ रहे है कल, ट्रेलर के साथ अशी कॅप्शन देत ट्रेलर प्रदर्शनासाठी केवळ एक दिवस असल्याचे तिने सांगितले आहे. या नव्या पोस्टमध्ये अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) दिसत आहे. गंगूबाई काठियावाडीमध्ये आलिया भट्टशिवाय अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, अजय देवगणच्या लूकबाबत अद्याप निर्मात्यांनी खुलासा केलेला नाही.
  तसेच कालही आलियाने नवे पोस्टर शेअर करत ट्रेलरची तारिख जाहिर केली होती. 'या पोस्टमध्ये आलिया नाकात नथ, लाल रंगाची बिंदी आणि पांढऱ्या रंगाची साडी अशा लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरमधील आलियाच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाची रिलीज डेट 18 फेब्रुवारी 2022 निश्चित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्याची रिलीज डेट पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. अखेर 25 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Ajay devgan, Alia Bhatt, Bollywood, Bollywood News, Entertainment, Movie release, Trailer, Upcoming movie

  पुढील बातम्या