जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Nysa Devgn: काय सांगता! न्यासा नाही तर हे आहे अजयच्या लेकीचं खरं नाव; अखेर सगळ्यांसमोर केलं उघड

Nysa Devgn: काय सांगता! न्यासा नाही तर हे आहे अजयच्या लेकीचं खरं नाव; अखेर सगळ्यांसमोर केलं उघड

न्यासा देवगण

न्यासा देवगण

अजय देवगण आणि काजोलची लाडकी मुलगी न्यासा देवगण सध्या चर्चेत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होताना दिसतात. न्यासा नुकतीच एका पार्टीत दिसली होती. तेव्हा तिचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 एप्रिल : बॉलिवूड स्टार्सबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये जितकी क्रेझ आहे, तितकेच  स्टार किड्स देखील लोकप्रिय आहेत. मग तो शाहरुख खानचा मुलगा आर्यन असो की सैफ अली खानचा मुलगा तैमूर. सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओंचा बोलबाला असतो. पॅप्सही अनेकदा त्यांना त्यांच्या कॅमेऱ्यात टिपताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांची फॅन फॉलोइंग सुपरस्टारपेक्षा कमी नाही. यातच अजय देवगण आणि काजोलची लेक देखील आघाडीवर आहे. न्यासा नुकतीच एका पार्टीत दिसली होती. तेव्हा तिचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा ही त्या स्टार किड्सपैकी एक आहे, जिच्या नावाबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ असतो.  अनेकदा चाहते तिला न्यासा, नैशा किंवा निशा म्हणतात. तिचा नावाचे स्पेलिंग असे आहे की लोक त्याचा उच्चार चुकीचा करतात. अलीकडे, जेव्हा पॅप्स ‘न्यासा-न्यासा’ ओरडत होते, तेव्हा स्टार किड चिडली आणि तिने तिचे खरे नाव सगळ्यांना सांगितले.

News18लोकमत
News18लोकमत

खरं तर, न्यासा नुकतीच वांद्रे येथील एका रेस्टॉरंटच्या बाहेर तिचा जिवलग मित्र ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ऑरी, मौनी रॉय आणि कोरिओग्राफर तुषार कालिया यांच्यासोबत दिसली होती. न्यासाला पाहून पॅप्स फोटोसाठी ओरडू लागले. तेवढ्यात गाडीत बसताना ती म्हणाली, ‘माझे नाव निसा आहे…’ हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींनी तिच्या नावाचा उच्चार वेगळा असेल तर नावाचं स्पेलिंगही तसंच लिहायला हवं असा सल्ला दिला आहे. तर काही जण तिची खिल्ली उडवताना दिसत आहे. Dharmendra : ‘मरतानाही तुला सुखी करेन….’ असं का म्हणाले धर्मेंद्र? अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत गेल्या काही काळापासून निसा आणि ओरहान अवत्रामणी अनेकदा एकत्र दिसत आहेत. यापूर्वी दोघेही राजस्थानमध्ये  व्हेकेशन एन्जॉय करताना दिसले होते. राजस्थानच्या व्हेकेशनचे फोटो ओरहान अवत्रामणीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निसा देवगन आणि ओरहान अवत्रामणी यांच्याशिवाय इतर मित्रही दिसत होते.

जाहिरात

सिंगापूरमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर निसा स्वित्झर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. न्यासा ही अजय आणि काजोलची मोठी मुलगी आहे. त्याला युग देवगण नावाचा भाऊही आहे. निसाचे फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होताना दिसतात.  या स्टारकिड विषयी जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना नेहमीच असते. तिच्या चेहऱ्याच्या सर्जरीवरदेखील अनेक वेळा चर्चा होताना दिसते. तिचे पार्टीतील व्हिडीओ तर नेहमीच व्हायरल होतात. तसंच आई वडिलांप्रमाणे निसा देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात