मुंबई, 14 एप्रिल : अभिनेता धर्मेंद्र भारतीय चित्रपटसृष्टीतील एक चिरतरुण अभिनेते आहेत. या वयात अजूनही ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांची या वयातील ऊर्जा आजही चाहत्यांना प्रेरणा देते. धर्मेंद्र सोशल मीडियावर सुद्धा कार्यरत आहेत. ते आपले लाईफ अपडेट्स, कविता चाहत्यांसोबत शेअर करत असतात. धर्मेंद्र यांनी नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते ‘लगता नहीं है जी मेरा’ हे दुःखी गाणे ऐकताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करत धर्मेंद्र यांनी लिहिले होते, ‘मित्रांनो आज मी काहीसा उदास आहे.’ धर्मेंद्रच्या या ट्विटनंतर चाहते काळजीत पडले आणि अभिनेत्याला त्याच्या दुःखाचे कारण विचारू लागले. यावर आता धर्मेंद्र यांनी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी एक ह्रदयस्पर्शी कविता शेअर केली आहे. काय म्हणतायत ते पाहूया.
धर्मेंद्र यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते दुःखी गाणे का ऐकत होते हे देखील सांगितले आहे. 87 वर्षीय धर्मेंद्र अनेकदा ट्विटरवर त्यांच्या आयुष्याशी आणि करिअरशी संबंधित मजेदार किस्से शेअर करत असतात. ते अनेकदा त्यांच्या फार्महाऊसचे व्हिडिओ शेअर करताना दिसतात. आता धर्मेंद्रने एक नवीन व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे टेन्शन दूर केले आहे. व्हिडिओमध्ये धर्मेंद्र म्हणत आहेत, ‘नमस्कार मित्रांनो, मी दु:खी नाही. जफर साहेबांनी लिहिलेली ही कविता मला खूप आवडते. मी फक्त संध्याकाळी ऐकत आणि गुणगुणत करत बसलो होतो, म्हणून मी ते रेकॉर्ड केले. ही सुंदर कविता मी माझ्या लहान भावांना, मित्रांना आणि मुलांना पाठवण्याचा विचार केला. त्यामुळे मी अजिबात दु:खी नाही, एकदम ठीक आहे.’ जेव्हा मिथुन चक्रवर्तीने जिरवली राज कुमारची घमेंड; अभिनेत्याची झालेली बोलती बंद यानंतर धर्मेंद्र यांनी सर्वांना बैसाखीच्या शुभेच्छा दिल्या आणि एक कविता वाचली. कविता अशी आहे,‘मिट्टी का बेटा हूं, मरते-मरते भी खुश कर जाऊंगा। उखड़ती-बूढ़ी सांसों से चुराके चंद सांसे मैं, चीरके सीना धरती का फसल नई एक बो दूंगा। खेतों में फिर हरियाली की चादर जब बिछ जाएगी। उग आएगी जवानी मेरी, सांसों में सांसें भी आ जाएंगी। फिर होकर लथपथ मिट्टी में, मैं खेतों में भागूंगा। नाचूंगा, गाऊंगा और फिर पत्ते-पत्ते फसल सुनहरी जब हो जाएगी, लेकर दांती हाथों में, गाता गीत बैसाखी के, मैं सोने के ढेर लगा दूंगा, मैं सोने के ढेर लगा दूंगा। आज बैसाखी है। बैसाखी की बहुत बहुत शुभकामनाएं, बधाइयां। जीते रहो सारे, खुश रहो।’ असं म्हणत त्यांनी चाहत्यांना बैसाखीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
धर्मेंद्र यांच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर तर लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहेत. याशिवाय ते त्यांच्या होम प्रोडक्शनचा चित्रपट ‘अपने 2’ मध्येही दिसणार आहेत. धर्मेंद्र अलीकडेच ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेबसीरिजमध्ये दिसले होते.