मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

#BREAKING : ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

#BREAKING : ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या (Aaradhya ) यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. तर, जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या (Aaradhya ) यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. तर, जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या (Aaradhya ) यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. तर, जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई, 12 जुलै : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिषेक बच्चन (abhishek bachchan) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. याआधी या तिघींचीही अॅंटीजेन (antigen) रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र आता ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या (Aaradhya ) यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. याआधी ऐश्वर्या आणि आराध्या यांचे पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तर, जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या यांना कोणतीही लक्षणं नाही आहेत. त्यामुळे त्यांना सध्या घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल. मात्र दोघींनी कोणतीही लक्षणं नसल्यामुळे त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला मुंबई पालिकेने दिला आहे. वाचा-'वेळच तर आहे निघून जाईल', कोरोनाग्रस्त अमिताभ यांच्या प्रेरणादायी कवितेचा VIDEO दरम्यान, बच्चन कुटुंबीय राहत असलेला जलसा हा बंगला सील करण्यात आला असून त्याला कन्टेंन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. जलसामध्ये सध्या पालिकेचे डॉक्टर असून घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चाचणी केली जाणार आहे. वाचा-बच्चन कुटुंबानंतर आता अनुपम खेर यांच्याही घरात कोरोनाचा शिरकाव वाचा-कोरोनाची सौम्य लक्षणं असूनही अमिताभ बच्चन यांना का केलं रुग्णालयात दाखल? शनिवारी रात्रीच बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. दरम्यान, अमिताभ आणि अभिषेक या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसत होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. अमिताभ यांनी ट्वीट करत, 'गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कृपया COVID टेस्ट करून घ्यावी', अशी विनंती त्यांनी Tweet करून केली आहे.', अशी विनंती केली. वाचा-...आणि बिग बींचा नानावटी रुग्णालयातील तो जुना VIDEO पुन्हा VIRAL
First published:

Tags: Abhishek Bachchan, Amitabh Bachchan

पुढील बातम्या