...आणि अमिताभ बच्चन यांचा नानावटी रुग्णालयातील तो जुना VIDEO पुन्हा VIRAL

अमिताभ यांची COVIDE-19चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनीच ट्विटरवरून दिली आहे

अमिताभ यांची COVIDE-19चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनीच ट्विटरवरून दिली आहे

  • Share this:
    मुंबई, 12 जुलै: कोरोनाची लागण आता राजकीय नेत्यांनंतर बॉलिवूडमधील दिग्गचांनाही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी कोरोना पोहोचला आहे. बिग बींची प्रकृती शनिवारी रात्री बिघडल्यानं त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची कोरोना चाचाणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये बि बींनी डॉक्टरांचे खूप आभार मानले आहेत. डॉक्टरांना देवाची उपमा दिली आहे. कोरोनाच्या महासंकटात देवासारखं जीव वाचवण्याचं काम ते करत असल्याचं बिग बी म्हणाले. त्यांनी डॉक्टरांचे खूप आभारही मानले आहेत. अमिताभ यांचा हा व्हिडीओ जुना असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर पुन्हा तुफान व्हायरल झाला आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची लागण (Covid-19) झाल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेकसुद्धा COVID पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. अमिताभ यांनी स्वतःच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी Tweet करून दिली. आता मुलगा अभिषेकसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. या आधीही बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांचं शुटिंग बंद असल्याने अमिताभ हे घरीच होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना तातडीने नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: