मुंबई, 12 जुलै : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या घरातही कोरोनाव्हायरसने (coronavirus) शिरकाव केला. अमिताभ आणि अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्याचेही (Aaradhya ) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडियावर एक कविता शेअर केली. कोरोनाशी लढा देण्यासाठी बळ देणारी अशी ही कविता. अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही कविता शेअर केली होती. मृत्यू रूप बदलून आला आहे, मात्र ही वाईट वेळ निघून जाईल, अशा आशयाची ही कविता आहे. अमिताभ यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचा आणि विश्वास जागवण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी रात्रीच बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. हे वाचा - …आणि बिग बींचा नानावटी रुग्णालयातील तो जुना VIDEO पुन्हा VIRAL यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. याआधी या तिघींचीही अॅंटीजेन (antigen) रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र आता ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. तर जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. हे वाचा - बच्चन कुटुंबानंतर आता अनुपम खेर यांच्याही घरात कोरोनाचा शिरकाव दरम्यान, बच्चन कुटुंबीय राहत असलेला जलसा हा बंगला सील करण्यात आला असून त्याला कन्टेंन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. जलसामध्ये सध्या पालिकेचे डॉक्टर असून घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चाचणी केली जाणार आहे.