बच्चन कुटुंबानंतर आता अनुपम खेर यांच्याही घरात कोरोनाचा शिरकाव

बच्चन कुटुंबानंतर आता अनुपम खेर यांच्याही घरात कोरोनाचा शिरकाव

कोरोनाचे सावट आता सामान्यांपासून बॉलिवूडही आलेले दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : कोरोनाचे सावट आता सामान्यांपासून बॉलिवूडही आलेले दिसत आहेत. शनिवारी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चाहते चिंतेत असताना आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनुपम खेर यांच्या आई कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यांना कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनुपम खेर यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. अनुपम खेर यांचा भाऊ, वहिनी आणि पुतणी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान अनुपम खेर यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली, मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अनुपम खेर यांच्या आईमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. खेर यांनी याबाबत मुंबई महापालिकेला माहिती दिली आहे.

अनुपम खेर यांनी व्हिडीओमध्ये सांगितले की, काही दिवसांपासून त्यांची आई दुलारी यांची प्रकृती खराब होती. त्यांना भूक लागत नव्हती, अशक्तही वाटत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर सीटी स्कॅन केले गेले त्यावेळी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचे आढळून आले.

यानंतर अनुपम आणि त्याचा भाऊ राजू यांचीही कोरोना टेस्ट झाली. या अनुपम यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, त्यांच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर राजू खेर यांच्या कुटूंबाची कोरोना टेस्टही झाली. यात राजू यांची पत्नी आणि मुलगी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

अनुपम यांनी सांगितले की, त्यांच्या आईला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पालिकेला कळविण्यात आले असून आता त्यांचे घर सॅनिटाइज करण्यात आले आहे. अनुपम यांनी यावेळी चाहत्यांना आपल्या पालकांची काळजी घेण्याचे आवाहनही केले.

शनिवारी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची लागण (Covid-19) झाल्याची बातमी समोर आलेली असतानाच आता त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेकसुद्धा COVID पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे.

संपादन- प्रियांका गावडे

Published by: Kranti Kanetkar
First published: July 12, 2020, 11:07 AM IST

ताज्या बातम्या