कोरोनाची सौम्य लक्षणं असूनही अमिताभ बच्चन यांना का केलं रुग्णालयात दाखल?

कोरोनाची सौम्य लक्षणं असूनही अमिताभ बच्चन यांना का केलं रुग्णालयात दाखल?

अमिताभ आणि अभिषेक या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी स्वत: करत कोरोना (CoronaVirus) चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. शनिवारी रात्रीच बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. तिघांचीही अॅंटीजेन (antigen) रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, स्वॅब टेस्टचे रिपोर्ट अद्याप आलेले नाही आहेत.

दरम्यान, अमिताभ आणि अभिषेक या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसत होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. अमिताभ यांनी ट्वीट करत, 'गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कृपया COVID टेस्ट करून घ्यावी', अशी विनंती त्यांनी Tweet करून केली आहे.', अशी विनंती केली.

त्यानंतर अभिषेक बच्चननं, "मी आणि माझे बाबा कोरोना पॉझिटिव्ह आहोत. आम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, त्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही विनंती करतो की, चाहत्यांनी संयम बाळगावा. आम्ही मुंबई महापालिकेच्या संपर्कात आहोत".

अमिताभ यांचे 75% यकृत आहे खराब

अमिताभ बच्चन सध्या 77 वर्षांचे आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणं असूनही त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे कारण म्हणजे त्यांचे यकृत (Liver). अमिताभ यांचे केवळ 25% यकृत कार्यरत आहे. अमिताभ यांना हिपॅटायटीस बी (Hepatitis B ) होता, त्यामुळं त्यांचे 75% यकृत खराब झाले आहे. तर काही वर्षांपूर्वी त्यांना टीबीही झाला होता. अमिताभ यांनी स्वत: टीव्ही शो दरम्यान याबाबत माहिती दिली होती. असे असले तरी बीग बी आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतात. नियमित व्यायामाबरोबर ते फिरायलाही जातात.

संपादन - प्रियांका गावडे

Published by: Priyanka Gawde
First published: July 12, 2020, 8:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading