मुंबई, 22 नोव्हेंबर : बॉलिवू़ड अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) नुकताच 'बंटी और बबली 2' (Bunty Aur Babli 2)’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. ज्यामध्ये राणी मुखर्जी (Rani Mukerji) व्यतिरिक्त सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि शर्वरी वाघ (Sharvari Wagh) हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सैफ राणी मुखर्जीसोबत लोकांची फसवणूक करताना दिसत आहे. दरम्यान, सैफ अली खानने त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'बंटी और बबली 2' चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा मुलगा तैमूर अली खानची प्रतिक्रिया कशी होती हे सांगितले आहे.
बंटी और बबली २ मध्ये सैफ अली खान एका मध्यमवर्गीय माणसाच्या भूमिकेत साकारताना दिसत आहे. जो नंतर लोकांची फसवणूक करताना म्हणजे चोरी करताना दिसतो. या चित्रपटाबद्दल मुलगा तैमूर अली खानच्या प्रतिक्रियेबद्दल पिंकविलाशी बोलताना सैफ म्हणाला की, 'तैमूरला नायक आणि खलनायकातील फरक चांगलाच ठाऊक आहे.'
वाचा : गोविंदाच्या नावावर सुरू होता हा धक्कादायक प्रकार; समजल्यानंतर घेतला मोठा निर्णय
'मी फक्त खलनायक किंवा नायक नाही, त्यामुळे चित्रपट बघताना तैमूर म्हणाला, 'तू या चित्रपटात चांगला का आहेस, तू या चित्रपटात लोकांना का मारतोस? तुम्ही लोकांना फसवता का? तू या चित्रपटात नेमके काय करतो आहेस?’ यावर मी त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मी म्हणालो- ‘ठीक आहे, ही एक सुंदर भूमिका आहे, तो एक चांगला माणूस आहे आणि कोणालाही मारत नाही. तो चोर आहे.
'मग लोकांचे सतत ऐकल्यानंतर त्याला समजले की, मी चित्रपटात जे काही करतोय, ते नाटक आहे.' याआधी तैमूरबद्दल बोलताना सैफ अली खानने असाच एक किस्सा सांगितला होता. 'तान्हाजीः द अनसंग वॉरियर' हा सिनेमा पाहिल्यानंतर तैमूरने बनावट तलवावर घेऊन लोकांचा पाठलाग सुरू केला होता.
वाचा : 'घाई गडबडीत उलटं ब्लाऊज घातलंस का ?'; आलिया भट्ट कपड्यावरून होतेय ट्रोल
बंटी और बबली 2 हा 2005 मध्ये आलेल्या हिट चित्रपट बंटी और बबलीचा सीक्वल आहे. यामध्ये सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. 2005 मध्ये आलेल्या बंटी और बबलीमध्ये अभिषेक बच्चनने बंटी 'राकेश त्रिवेदी'ची भूमिका साकारली होती. या सिक्वलमध्ये सैफ अली खानने अभिषेक बच्चनची जागा घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Kareena Kapoor, Saif Ali Khan, Taimur ali khan