मुंबई, 06 जून : अभिनेता प्रभास, कृती सेनन आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे प्रमुख भूमिकेत असलेला आदिपुरूष हा सिनेमा संपूर्ण देशात रिलीज होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. 16 जूनला देशभरात रिलीज होणार आहे. सिनेमाचा एक ट्रेलर तुफान गाजलाच पण आता सिनेमाच्या रिलीजला काही दिवस बाकी असताना निर्मात्यांनी सिनेमाचा आणखी एक भव्य आणि अॅक्शनने भरलेला ट्रेलर लाँच केला आहे. या स्पेशल ट्रेलरसाठी तिरुपती येथे मेगा इव्हेंट भरवण्यात आला होता. तिथे मोठ्या प्रमाणात तरूणांनी गर्दी केली होती. आदिपुरूषचा नवा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून सोशल मीडियावर या ट्रेलरनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 2 मिनिटं 27 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या भावना पाहायला मिळत आहेत. अॅक्शनने भरलेल्या या ट्रेलरमध्ये प्रभु श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाची झलक दाखवण्यात आली आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहण्यासाठी तिरुपतीमध्ये तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. सिनेमाच्या जय श्री राम जय श्रीराम या गाण्यावर तरूणाई चांगलीच थिरकताना पाहायला मिळाली. हातात भगवे झेंडे घेत तरूणांचा उत्साह पाहायला मिळाला. हेही वाचा - Adipurush : आदिपुरूष पाहण्यासाठी हनुमान येणार थिएटरमध्ये? एक सीट असणार राखीव; काय आहे प्रकरण?
तिरुपतीच्या मोठ्या ग्राऊंडमध्ये आदिपुरूषचा भव्य ट्रेलर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अभिनेता प्रभासची साऊथमध्ये किती क्रेझ आहे हे यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळालं. सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळी झालेली गर्दी पाहता सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी छप्पर तोड कमाई करणार असल्याचं दिसत आहे. ट्रेलरसाठी भव्य स्टेज उभारण्यात आला होता उपस्थित लोकांनी हातात भगवे झेंडे घेत जय श्रीरामच्या घोषणा देताना पाहायला मिळात.
इतकंच नाही तर आदिपुरूषच्या निर्मात्यांनी सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान प्रत्येक शोला प्रत्येक ठिकाणी एक सीट रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही निकामी सीट भगवान हनुमान यांच्यासाठी असणार आहे. आदिपुरूष सिनेमाचं एकूण बजेट 500 कोटी रुपये आहे. सिनेमानं रिलीजआधीच एकूण बजेटच्या 85% कमाई केली आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होणार की फ्लॉप, हे येणारा काळच सांगेल.