मुंबई, 06 जून : बॉलिवूडचा बहुप्रतिक्षीत आदिपुरूष हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता प्रभास, कृती सेनन, देवदत्त नागे प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. सिनेमाचा दमदार ट्रेलर आल्यापासून सिनेमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळतेय. सिनेमा रिलीज होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिलेले असताना सिनेमाच्या टीमनं मोठी घोषणा केली आहे. सिनेमाचं अॅडवॉन्स बुकींग मोठ्या प्रमाणात झालं आहे. दरम्यान सिनेमा रिलीज झाल्यानंतर भारतातील प्रत्येक थिएटरमध्ये एक सीट राखीव ठेवण्यात येणार आहे. आता या सीटवर कोण बसणार ? असा प्रश्न तुम्हाला पडला असले. काय आहे हे प्रकरण पाहूयात. आदिपुरूषच्या निर्मात्यांनी सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान प्रत्येक शोला प्रत्येक ठिकाणी एक सीट रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही निकामी सीट भगवान हनुमान यांच्यासाठी असणार आहे. “भगवान हनुमान यांच्याप्रती लोकांच्या मनात श्रद्धा आहे. जेव्हा रामायणाचं पठण केलं जातं तेव्हा तिथे भगवान हनुमान प्रकट होतात असं मानलं जातं. आता हा आमचा विश्वास आहे. या श्रद्धेचा मान ठेवून आदिपुरूषच्या प्रत्येक स्क्रिनिंग दरम्यान एक सीट आरक्षित ठेवली जाणार आहे”, असं निर्मात्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा - Adipurush : काय सांगता! प्रभासच्या ‘आदिपुरुष’ने रिलीजपूर्वीच कमावले कोट्यवधी; केलाय मोठा विक्रम निर्मात्यांनी पुढे म्हटलं, “हनुमान रामाचे सर्वात मोठे भक्त होते. रामाच्या या सर्वात मोठ्या भक्ताला सन्मान देणारा त्यांचा इतिहास पाहा. हे महान कार्य आम्ही अज्ञात मार्गाने सुरू केलंय. हनुमानाच्या सानिध्यात आपण सर्वांनी आदिपुरूष हा भव्य सिनेमा पाहिला पाहिजे”.
Team #Adipurush to dedicate one seat in every theater for Lord Hanuman 🚩🙏🏻
— Movies wallah (@Movies_Wallah) June 6, 2023
Jai Shri Ram 🙏 #Adipurush in cinemas worldwide on 16th June! ✨ #AdipurushTrailer2 #AdipurushOnJune16th#AdipurushActionTrailer#AdipurushIn3D #Prabhas #SaifAliKhan #KritiSanon #SunnySingh #OmRaut pic.twitter.com/UcP7Aafks8
आदिपुरूष सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळ्या ओम राऊतनं केलं आहे. आदिपुरूष हा सिनेमा तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. ओम राऊतनं सिनेमाचं दिग्दर्शन करण्याबरोबरच सिनेमाचं लिखाण देखील केलं आहे. अभिनेता प्रभास यात रामाच्या प्रमुख भूमिकेत आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीतेची भूमिका साकारणार आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान तर हनुमानाचं प्रमुख पात्र हे मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे साकारणार आहे. तर अभिनेता सनी सिंह लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आदिपुरूष सिनेमाचं एकूण बजेट 500 कोटी रुपये आहे. सिनेमानं रिलीजआधीच एकूण बजेटच्या 85% कमाई केली आहे. ट्रेन्ड अॅनालिस्टच्या म्हणण्यानुसार आदिपुरुष हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई करू शकतो.