मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 500 कोटी रुपयांमध्ये बनला आहे. चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच त्याच्या एकूण बजेटच्या 85% कमाई केली आहे.
आता निर्मात्यांनी त्याचे नॉन-थिएटर राइट्स, सॅटेलाइट राइट्स, म्युझिक राइट्स, डिजीटल राइट्स आणि इतर अनेक हक्क रिलीझपूर्वी विकून 247 कोटी रुपये कमावले आहेत.
याशिवाय, चित्रपटाने दक्षिणेतील थिएटरच्या कमाईतून किमान हमी म्हणून 185 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाला आता फक्त 68 कोटींची कमाई करायची आहे.
दरम्यान, ट्रेड अॅनालिस्टच्या म्हणण्यानुसार आदिपुरुष हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई करू शकतो.
केवळ हिंदी मार्केटच नाही तर तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम सर्वच इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाची चर्चा आहे.
'आदिपुरुष' हा चित्रपट हिंदू रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात प्रभास भगवान राम, क्रिती सेनन माँ सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे.
'आदिपुरुष' 16 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून सर्वजण त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होणार की फ्लॉप, हे येणारा काळच सांगेल.