बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.
दिशा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. अलीकडे दिशा टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिली होती. आता ती एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली आहे. मिस्ट्री मॅनसोबत दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपूर्वी दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. हे दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या ब्रेकअपची बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता दिशा पाटणीला एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे.
गेल्या आठवड्यात, दिशा या मिस्ट्री मॅनसोबत डिनरसाठी बाहेर जाताना दिसली होती, त्यामुळे आता तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर फिरत आहे.
दिशाला या मिस्ट्री मॅनसोबत पाहून चाहते मात्र टायगर श्रॉफबद्दल विचारत आहेत. आता या दोघांचं खरंच ब्रेकअप झालं आहे का अशी शंका चाहत्यांना वाटत आहे.
खरं तर, दिशा पटानी सोबत असलेला मिस्ट्री मॅन दुसरा कोणी नसून तिचा ट्रेनर अलेक्झांडर अॅलेक्स इलिक आहे, जो एक अभिनेता आणि मॉडेल देखील आहे. अॅलेक्सने दिशासोबतचे अनेक फोटो सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांनी त्यांच्या ब्रेकअपवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी या फोटोंनंतर या दोघांमध्ये निश्चितकाहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा आहेत. याच दरम्यान आता दिशाची या मिस्ट्री मॅनसोबत खरंच काही केमिस्ट्री आहे का, हा लोकांचा गैरसमज आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.