जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Adipurush: 'हनुमानजी बहिरे होते का...? आदिपुरुषच्या वादात ओम राऊतचं 'ते' ट्विट व्हायरल; नेटकऱ्यांचा संताप

Adipurush: 'हनुमानजी बहिरे होते का...? आदिपुरुषच्या वादात ओम राऊतचं 'ते' ट्विट व्हायरल; नेटकऱ्यांचा संताप

आदिपुरुष वादात ओम राऊतचं जुनं ट्विट व्हायरल

आदिपुरुष वादात ओम राऊतचं जुनं ट्विट व्हायरल

आदिपुरुष रिलीज झाल्यानंतर सध्या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. अशातच आता आगीत तेल म्हणून की काय ओम राऊतने काही वर्षांपूर्वी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर केलेलं एक ट्विट व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 जून :  या वर्षातील सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा ‘ आदिपुरूष ‘ची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते.हा चित्रपट 16 जून रोजी रिलीजही झाला. मात्र सिनेमातील कलाकारांचे डायलॉग, VFX, अभिनय सगळ्यावरच सडकून टीका करण्यात येत आहे. सिनेमात भगवान हनुमानाच्या तोंडी असलेले काही डायलॉग सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. तर प्रभासच अभिनय आणि VFX यांची देखील खिल्ली उडवली जातेय. या सगळ्या प्रकारानंतर चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत  नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. अशातच आता आगीत तेल म्हणून की काय ओम राऊतने काही वर्षांपूर्वी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर केलेलं एक ट्विट व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ओम राऊतचे हे ट्विट 2015 सालचे आहे. राऊत यांनी केलेल्या या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘भगवान हनुमान बहिरे होते का? माझ्या इमारतीच्या आजूबाजूच्या लोकांना असे वाटते. विशेषत: हनुमान जयंतीच्या दिवशी जेव्हा लोक असंबद्ध गाणी जोरजोरात वाजवतात.’ आता नेटकरी या ट्विटवरून ओम राऊतला खूपच ट्रोल करत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

ओम राऊतच्या या जुन्या व्हायरल ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘ओम राऊत जी, धर्माला व्यवसाय बनवणे बंद करा.’ दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘ही व्यक्ती प्रत्येक क्षणी आपले रंग आणि विधान बदलते.’ Adipurush: रावण आणि माता सीतेमधील तो सीन पाहून प्रेक्षक संतप्त; वाद वाढताच निर्मात्यांनी दिलं असं स्पष्टीकरण ओम राऊतचे व्हायरल ट्विट पाहून आणखी एका युजरने संताप व्यक्त केला आणि लिहिले, ‘हिंदू देवतांवर असे विचार असलेल्या लोकांकडून रामायणावर चांगला चित्रपट बनवण्याची अपेक्षा कशी करू शकतो? आदिपुरुष हा आपल्या इतिहासाचे विकृतीकरण करून तरुण पिढीला त्यांच्या मुळापासून वेगळे करण्याचा बॉलीवूडचा स्पष्ट कट आहे. ओम राऊतचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटावर ‘रामायण’मधील व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आणि दृश्यांशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटात अनेक असे संवाद देखील आहेत, ज्यावर चाहते प्रचंड संतापले आहेत. प्रभास स्टारर चित्रपटाने हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करत त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे.

जाहिरात

तर दुसरीकडे, सर्व विरोधाला न जुमानता ‘आदिपुरुष’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या दिवशी 86.75 कोटींचा व्यवसाय केला. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी 60 कोटींची कमाई केली आहे. तथापि, टीकेच्या दरम्यान, अशीही बातमी आहे की बरेच लोक बुक केलेली तिकिटे देखील रद्द करत आहेत, ज्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात