हल्लाबोल टास्कमध्ये उत्कर्ष शिंदे हा संचालक होता. मात्र उत्कर्षने पक्षपात केला असल्याने महेश मांजरेकर यांनी त्याला चांगलेच सुनावले आहेत. हल्लाबोल टास्क दरम्यान जयच्या गटाने मिर्चीची धुरी वापरली होती. मात्र दुसऱ्या गटाला मिठाचं पाणी वापरण्यास उत्कर्षने मनाई केली. यावर महेश मांजरेकर यांनी उत्कर्षची चांगलीच शाळा घेतली आहे. Nagpur Job Alert: तायवाडे कॉलेज कोराडी नागपूर इथे तब्बल 62 जागांसाठी पदभरती तो सगळ्यात पार्शियल संचालक असल्याच म्हणत त्याला खडेबोल सुनावले. यानंतर सोशल मीडियावर उत्कर्षच्या नावाची चर्चा रंगलेली आहे. यानंतर त्याचा भाऊ आदर्श शिंदेने त्याला पाठिंबा दिला आहे. आता आदर्शच्या या पोस्टवर महेश मांजरेकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. यासोबतच महेश मांजरेकर यांनी कान टोचल्यानंतर उत्कर्ष त्याच्या वागण्यात काही बदल करणार का, हे देखील येणाऱ्या काळात समजेल. यासोबतच आजच्या चावडीवर देखील काय होणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bigg boss marathi