Home /News /entertainment /

आमिर खानची मुलगी इरा Depressionनंतर करतेय ‘या’ समस्येचा सामना, VIDEO शेअर करत सांगितली व्यथा

आमिर खानची मुलगी इरा Depressionनंतर करतेय ‘या’ समस्येचा सामना, VIDEO शेअर करत सांगितली व्यथा

बॉलिवूड अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान (Ira Khan) बॉलिवू़डपासून दूर असली तरी नेहमी चर्चेत असते. इराने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ती तिच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिसत आहे.

  मुंबई, 03 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान (Ira Khan) बॉलिवू़डपासून दूर असली तरी नेहमी चर्चेत असते. इरा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर लाखाच्या घरात लोक तिला फॉलो करतात व तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच तिच्या आयुष्याशी संबंधीत काही गोष्टींची माहिती सोशल मीडियावर देत असते. सोशल मीडिायवर इरा अनेकवेळा तिच्या नैराश्याबद्दल (Ira Khan Depression) मानसिक आरोग्याबद्दल बोलताना दिसली आहे. आता इराने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात इरा खान मानसिक आरोग्याबद्दल बोलताना म्हणाली, जेव्हापासून तिला समजले की ती डिप्रेशनमध्ये आहे. त्यानंतर तिने शनिवारी तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ 10 मिनिटांचा आहे, ज्यामध्ये ती तिच्या फॉलोअर्सला त्याच्या प्रकृतीबद्दल सांगताना दिसते आहे.ज्यात तिने असे सांगितले की, डॉक्टरांनी माझे औषध बदलले आहे, त्यानंतर माझी तब्येत बरी नाही. मला खूप राग येत आहे. पहिला माझ्यासोबत असे काही होत नव्हते, असे इराने म्हटले आहे. वाचा :  Good News: Neha Dhupia दुसऱ्यांदा झाली आई ; घरी झालं चिमुकल्या मुलाचं आगमन इरा खानने तिच्या चाहत्यांसाठी 10 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. इराने सांगितले आहे की, तिला बऱ्याच दिवसांपासून खूप राग येत आहे हे सहसा तिच्या बाबतीत कधीच घडले नव्हते. तिला तिच्या रागाचा सामना कसा करावा हे माहित नसल्याने कधीकधी लाज देखील वाटत असल्याचे तिने सांगितले आहे. इराने पुढे असेही सांगितले की, तिला साधा-सुधा राग येत नाही, तर मी यासाठी माझ्या मानसोपचारतज्ज्ञांशी देखील संवाद साधणार असल्याचे इराने म्हटले आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ira Khan (@khan.ira)

  शुक्रवारी इरा ड्रायव्हिंग करून घरी जात होती पण ती घराच्या दिशेने गेलीच नाही. ती गाडी चालवत होती जेव्हा तिला कळले की ती रागावलेल्या अवस्थेत आहे आणि स्वतः गाडी चालवण्याच्या स्थितीत नाही. त्यावेळी तिने कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती. तेव्हा कोणीतरी तिला उचलण्यासाठी आले तेव्हा ती फक्त रडत असल्याचे इराने सांगितले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या