जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यासोबत आर्चीला जायचंय डेटवर, रिलेशनशिप स्टेटस बद्दल म्हणते...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यासोबत आर्चीला जायचंय डेटवर, रिलेशनशिप स्टेटस बद्दल म्हणते...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यासोबत आर्चीला जायचंय डेटवर, रिलेशनशिप स्टेटस बद्दल म्हणते...

कलर्स टीव्हीवरील ‘एकदम कडक’ या शोमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना आर्चीनं एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला डेट करायची इच्छा बोलून दाखवली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 नोव्हेंबर : सैराटमधील आर्ची अर्थात मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरु नेहमीच काही ना काही कारणारनं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिनं केलेलं फोटोशूट चर्चेत आलं होतं त्यानंतर आता आर्ची एका वेगळ्याच कारणानं चर्चेचा विषय ठरली आहे. सैराट सिनेमानंतर आर्चीच्या लव्ह लाइफ बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र एरवी याबद्दल बोलणं टाळणाऱ्या रिंकूनं नुकतंच तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल खुलासा केला. एवढंच नाही तर बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला डेट करण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी कलर्स टीव्हीवरील ‘एकदम कडक’ या शोमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना आर्चीनं एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला डेट करायची इच्छा बोलून दाखवली. या शोमध्ये आर्चीला एक दिवस डेट वर कोणासोबत जाऊ इच्छिते असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तिने विकी कौशलचं नाव घेतलं होतं आणि विकी कौशल का तर तो मला फार आवडतो असं उत्तर तिनं दिलं. काजोलसोबत फ्लर्ट करत होता मनिष पॉल, अजय देवगणनं काढली बंदुक आणि…

जाहिरात

सैराट नंतर आकाश ठोसर ने “लस्ट स्टोरीज” या वेबसिरीज मध्ये राधिका आपटे सोबत काम केले होते. याच वेब सिरीजमध्ये विकी कौशल ने देखील काम केले आहे. त्यानंतर उरी द सर्जिकल स्ट्राईक मध्ये देखील विकी कौशल ने काम केले आहे. रिंकू आणि आकाश चांगले मित्र आहेत. आकाशने काम केलेल्या ‘लस्ट स्टोरीज’ वेब सिरीज रिंकूने पहिली असेल आणि त्यातील विकीची भूमिका तिला आवडली असेल. त्यामुळे आता रिंकूची ही इच्छा पूर्ण होते का नाही याविषयी सर्वांना उत्सुकता आहे. KBC 11 : आई आजारी होती आणि मी देशासाठी खेळत होते, बिग बींसमोर रडली हिमा दास

याशिवाय काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीमधून तिनं तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दलही खुलासा केला.  रिंकून काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरुन तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. तिनं Ask Me Anything च्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी एका चाहत्यानं तिला तुझा बॉयफ्रेंड आहे असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर रिंकूनं नाही असं दिलं. घटस्फोटानंतर मलायकाचा तिरस्कार करतो अरबाज ? आता असं आहे दोघांमधील नातं ========================================================== परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात