मुंबई, 30 सप्टेंबर : छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिग बॉस मराठी 4 ची घोषणा करण्यात आली. 2 ऑक्टोबरपासून शो कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच शोच्या प्रीमियर सोहळ्याचा प्रोमो रिलीज झाला. ज्यात दोन स्पर्धक अत्यंत बोल्ड डान्स करताना दिसत आहेत. गाण्यात दोन्ही स्पर्धकांचे चेहरे काही दाखवण्यात आले नाहीत ‘मोहे रंग लगा दे’ या गाण्यावर डान्स करणारी ती अभिनेत्री नेहा खान असल्याचा अदांज अनेक प्रेक्षकांनी लावला. अभिनेत्री नेहा खान बिग बॉस मराठी 4 मध्ये दिसणार असल्याचं कळताच तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला मात्र खरंच नेहा शोमध्ये दिसणार आहे का? यावर खुलासा झाला आहे. अभिनेत्री नेहा खान म्हणजेच देवमाणूस मालिकेतील पोलीस ऑफिसर दिव्या सिंग. नेहाला बिग बॉस मराठी 3 साठी विचारणा झाली होती पण तिनं ऑफर नाकारली अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे नेहा आता चौथ्या पर्वात दिसणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. पण नेहा खान बिग बॉस मराठी 4मध्ये दिसणार नाहीये. नेहानं स्वत: ही माहिती फेक असल्याचं सांगितलं आहे. हेही वाचा - Bigg Boss Marathi : कधी सारंगे तर, कधी निखळ हसू; बिग बॉस मराठीच्या घरातील या क्यूट गर्ल्स आठवतात का? बिग बॉस मराठी 4 च्या प्रीमियर प्रोमो रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर नेहा खानचा बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे अशा पोस्ट देखील व्हायरल झाल्या. त्यातील एक पोस्ट नेहानं शेअर करत हे ‘फेक’ असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता नेहा खान बिग बॉस मराठी 4मध्ये दिसणार नाहीये यावर शिक्का मोर्तब झाला आहे.
बिग बॉस मराठीचं चौथं पर्व ऑल इज वेल असणार आहे असं म्हटलं जात आहे. अभिनेता महेश मांजरेकर शो होस्ट करणार आहे. मांजरेकर स्पर्धकांची वेगळ्या प्रकारे शाळा घेताना दिसणार का? बिग बॉस मराठी 4चं घर कसं असणार? कोण स्पर्धक असणार या सगळ्याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. येत्या 2 ऑक्टोबरच्या ग्रँड प्रीमियरमध्ये बिग बॉसच्या घरात जाणारे स्पर्धक प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
बिग बॉसचा पहिली सीझन अभिनेत्री मेघा धाडे जिंकली होती. तर दुसऱ्या सीझनमध्ये शिव ठाकरेनं बाजी मारली. तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेता विशाल निकमनं बाजी मारली. आता बिग बॉस मराठी 4 ची ट्रॉफी कोण पटकवणार याकडे सर्वाचं लक्ष आहे. तसंच दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरे आता बिग बॉस हिंदीमध्ये सहभागी झाला आहे.